नगराध्यक्षांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:52 IST2020-06-30T22:50:52+5:302020-06-30T22:52:35+5:30
शिरपूर : तालुक्यातील आंबे परिसरात असलेले ‘शिरपूर पॅटर्न’चे बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत, त्याची पहाणी पटेल परिवाराने सोमवारी केली़ ...

dhule
शिरपूर : तालुक्यातील आंबे परिसरात असलेले ‘शिरपूर पॅटर्न’चे बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत, त्याची पहाणी पटेल परिवाराने सोमवारी केली़ दरम्यान, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी तेथील आदिवासी महिलांना भेटून त्यांचे जनजीवन, संस्कृती व समस्या जाणून घेतल्यात़
गेल्या १७ वर्षापासून तालुक्यात ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत बंधाऱ्याचे कामे सुरू आहेत़ आतापर्यंत २५२ बंधारे बांधून पाणी अडविण्यात येत आहेत़ अद्यापही तालुक्यात अनेक भागात बंधाऱ्यांचे कामे सुरू आहेत़ गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस सांगवी मंडळात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागातील नदी-नाले, बंधारे ओव्हर फ्लो होवून वाहत आहेत़ त्यामुळे रविवारी अरूणावती नदीला देखील पूर आला होता़ रोहिणी, खंबाळे, आंबे परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे त्या भागात असलेले शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हर फ्लो होवून वाहत आहेत़
आंबे येथील विकास सोसायटीचे चेअरमन रमेश रामचंद्र माळी यांच्या शेतालगत असलेले चारही बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत़ रोहिणी-भोईटी परिसरातील बंधारे ही ओव्हर फ्लो झाले आहेत़ शिरपूर पॅटर्न अंतर्गत असलेल्या ओव्हर फ्लो बंधाºयांची पहाणी नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केली़ यावेळी केतकीबेन मुकेशभाई पटेल, कृतिबेन भूपेशभाई पटेल, कक्कूबेन पटेल, अंकीतभाई पारेख, स्नेहा अंकीतभाई पारेख, जैनेशभाई देसाई, दिशा जैनेशभाई पारेख, हिरल चिंतनभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उद्योगपती तथा नगरसेवक तपनभाई पटेल, रीमा तपनभाई पटेल आदी उपस्थित होते.
पटेल परिवाराने मानव केंद्राला भेट देवून पहाणी केली़ यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी आदिवासी महिलांचे जनजीवन, संस्कृती व समस्या जाणून घेतल्या.