मॅट क्र ८३४ ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; वाहक-चालकही विनामास्क !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:47+5:302021-06-24T04:24:47+5:30
धुळे आगारातून चोपडा शहरासाठी शटल सेवा सुरू आहे. या शटलच्या दिवसभरातून किमान पाच-सहा फेऱ्या होत असतात. या मार्गावर प्रवाशांची ...

मॅट क्र ८३४ ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; वाहक-चालकही विनामास्क !
धुळे आगारातून चोपडा शहरासाठी शटल सेवा सुरू आहे. या शटलच्या दिवसभरातून किमान पाच-सहा फेऱ्या होत असतात. या मार्गावर प्रवाशांची संख्याही चांगली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने धुळे-चोपडा बसने अमळनेरपर्यंत प्रवास केला. त्या बसमध्ये प्रवाशांची संख्या बऱ्यापैकी होती. बसमध्ये प्रवाशांची बेफिकिरी दिसून आले. प्रवाशांनी बसमध्ये चढताना गर्दी केलेली होती. काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हते. बसमध्ये चढताना सोशल डिस्टन्सिंग ठेवले नाही. तसेच बसमध्येही एकाच सीटवर दोन-तीन प्रवासी बसलेले दिसून आले. अशीच स्थिती राहिली तर कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखेच राहणार आहे.
एक तासाच्या प्रवासात कितीवेळ तोंडावर मास्क
धुळे-अमळनेर हा एक तासाचा प्रवास आहे. बसचा ताबा घेतल्यापासून चालकाच्या तोंडावर मास्क नव्हता.
वाहक
तिकिटाच्या निमित्ताने प्रवाशांच्या सतत संपर्कात असला तरी वाहकाने हनुवटीवरच मास्क लावलेला होता.
गाडीत बसलेल्या प्रवाशांनीही मास्क लावण्याचा केवळ बहाणाच केल्याचे दिसून आले.