रस्त्यातच प्रसूती मातेचा मृत्यू

By Admin | Updated: April 3, 2017 00:25 IST2017-04-03T00:25:20+5:302017-04-03T00:25:20+5:30

रस्त्यातच प्रसूती झालेल्या मनीषा संतोष ठाकरे (२४) या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

Maternal mortality in the streets | रस्त्यातच प्रसूती मातेचा मृत्यू

रस्त्यातच प्रसूती मातेचा मृत्यू

नंदुरबार : रस्त्यातच प्रसूती झालेल्या मनीषा संतोष ठाकरे (२४) रा.खतगव्हाण, ता.कुकरमुंडा या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
नंदुरबार तालुक्यातील व्याहूर येथून जिल्हा रुग्णालयात ही महिला प्रसूतीसाठी येत होती. रस्त्यातच तिला असह्य प्रसूती कळा झाल्याने ती नंदुरबारपासून अलीकडे काही अंतरावर प्रसूत  झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार घेताना  या महिलेचा मृत्यू झाला.
 

Web Title: Maternal mortality in the streets