मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:51+5:302021-07-26T04:32:51+5:30

भूषण चिंचोरे धुळे : मास्क वापरल्याने त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा व रॅशेस होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग ...

The mask relieves itchy skin | मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

भूषण चिंचोरे

धुळे : मास्क वापरल्याने त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा व रॅशेस होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नसल्याने मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, मास्क वापरताना योग्य काळजी घेतली तर असे त्रास होण्यापासून बचाव होऊ शकतो. चेहऱ्याला घट्ट बसणार नाहीत, आरामदायी असतील असे मास्क वापरले पाहिजेत.

मास्क आवश्यकच पण असे करा त्वचेचे रक्षण... !

कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे मास्क वापरणे आवश्यक आहे. पण त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.

घट्ट मास्क वापरल्याने चेहऱ्यावर कोरडेपणा येतो. तसेच रॅशेस होत असतात. त्यामुळे जास्त घट्ट मास्क वापरू नये, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.

सतत मास्क वापरल्याने काही जणांचा चेहरा खराब होतो, पुरळ येतात. त्यामुळे दररोज रात्री चेहऱ्याला मॉईशरायझर क्रीम लावावे. कोरडेपणा घालवण्यासाठी ते उपयोगी ठरते.

काही जणांना पुरळ

मास्कचा वापर केल्यामुळे काही जणांच्या चेहऱ्यावर पुरळ येतात. त्यामुळे घट्ट मास्क वापरू नये. कापडाचा मास्क वापरत असाल तर नियमित धुवा.

- डॉ. अभिजीत शिंदे, त्वचारोग तज्ज्ञ

मास्क वापरल्याने चेहऱ्यावर कोरडेपणा येऊ शकतो. पण, कोरोनाची लाट संपली नसल्याने मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क नियमित बदलून वापरावा.

- डॉ. राहुल शिंदे, त्वचारोग तज्ज्ञ

चांगले सॅनिटायझर वापरा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे.

चांगल्या कंपनीचे सॅनिटायझर वापरावे, लोकल सॅनिटायझर वापरल्याने त्रास होऊ शकतो.

अँटिसेप्टिक साबण वापरणेदेखील चांगले आहे. हात कोरडे पडत असतील तर मॉईशरायझर क्रीम वापरावे.

Web Title: The mask relieves itchy skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.