अन्नदानासह मास्क,सॅनेटाराझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:12 IST2020-04-13T22:12:02+5:302020-04-13T22:12:38+5:30

मनसे विद्यार्थी सेना : अठरा दिवसापासून नियमित उपक्रम, दारशुर व्यक्तींचा मदतीचा हात

Mask with food, sanitizer allocation | अन्नदानासह मास्क,सॅनेटाराझर वाटप

dhule

धुळे : कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे़ त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे़ गरीबांना अन्नदान, कारोनाच्या लढ्यात कार्यरत असलेल्या पोलिस, आरोग्य कर्मचारी सॅनिटायझर, मास्कचे वाटप गेल्या १८ दिवसापासून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी यांच्यामार्फत केले जात आहे.
संचारबंदीच्या काळात असंख्य गोर गरीब मजुरांचे अन्नाअभावी हाल होत आहेत़ याची दखल घेत मनसेतर्फे शहरातील झोपडपट्टी व गरीब वस्त्यात राहणाऱ्या गरजु कुटुबांना २५० फुड पॉकिटचे दररोज वाटप केले जात आहे़ लॉकडाउनच्या काळात पायी घराकडे निघालेल्या मजुरांना धुळ्यात गुरुद्वाराजवळ जेवणाची व्यवस्था तसेच मास्क तसेच सँनिटायझर वाटप केले गेले होते़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण व नातेवाईकांसाठी १०० फुड पॉकीट वाटप केले.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा फैलाव लगेच होतो़ अशा काळात देशसेवा व रूग्णसेवा व शहराची स्वच्छता करणाºया पोलिस, मनपा स्वच्छता कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत आहे़
त्यांच्या सुरक्षितेसाठी मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर वाटप करण्यात आले़ हा उपक्रम प्रसाद सतीष देशमुख, हर्षल परदेशी, यश शर्मा, गौरव गीते, प्रशांत व्यवहारे, संतोष मिस्तरी, गूरुराज पाटील, शुभम माळी, विठ्ठल पगारे राबवित आहे़
मनसेच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कोैतुक होऊ लागले आहे.

Web Title: Mask with food, sanitizer allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे