विवाहितेच्या भावासह वडिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:21 IST2018-03-01T19:21:39+5:302018-03-01T19:21:39+5:30

चांदगड येथील घटना : पोलिसात गुन्ह्याची नोंद

Married to father with his brother | विवाहितेच्या भावासह वडिलांना मारहाण

विवाहितेच्या भावासह वडिलांना मारहाण

ठळक मुद्देचांदगड येथील घटनाभावासह वडीलांना मारहाणदोघांविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बहिणीला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या मेहुण्यासह त्याच्या वडिलांना विरोध केल्याने विवाहितेच्या भावाला आणि वडिलांना मारहाण करण्यात आली़ ब्लेडनेही वार झाले़ हा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला़ 
चांदगड येथे राहणारा राजेंद्र अशोक कोळी (१८) या तरुणाने शिंदखेडा पोलिसात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, राजेंद्र कोळी याच्या बहिणीस शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथील सासरच्या घरी तिचे पती, सासरे त्रास देतात़ म्हणून तिला चांदगड येथे माहेरच्या मंडळींनी आणले होते़ त्यानंतर तिचे पती संतोष उका सोनवणे आणि सासरे उखा बुधा सोनवणे (रा़ अंतुर्ली ता़ शिरपूर) हे दोघे बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास चांदगड येथे तिला घेवून जाण्यास आले़ मात्र, तिला सासरी पाठविण्यास राजेंद्र कोळी याने विरोध केला़ त्याचा राग येऊन मेहुणा संतोष सोनवणे आणि उखा सोनवणे यांनी त्यास हाताबुक्यांनी मारहाण करु लागले़ यावेळी राजेंद्रचे वडील अशोक कोळी हे सोडवण्यास गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली़ यावेळी संतोष सोनवणे याने ब्लेडच्या सहाय्याने अशोक कोळी यांच्या गळ्यावर मारुन गंभीर दुखापत केली़ याप्रकरणी संतोष आणि उखा सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
 

Web Title: Married to father with his brother