प्रभाग १२ मध्ये उमेदवारांना चिन्हवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:12 IST2018-11-29T22:12:27+5:302018-11-29T22:12:58+5:30

सुधारीत कार्यक्रमानुसार प्रक्रिया : आता प्रचाराची रणधुमाळी

Marking candidates in ward 12 | प्रभाग १२ मध्ये उमेदवारांना चिन्हवाटप

प्रभाग १२ मध्ये उमेदवारांना चिन्हवाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक १२ साठी राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर केला होता़ त्यानुसार प्रभाग १२ मधील १४ उमेदवारांना गुरूवारी चिन्हवाटप करण्यात आले़ त्यात ४ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता़ 
शहरातील प्रभाग क्रमांक १२ हा मुस्लिमबहूल प्रभाग आहे़ त्यात १२ अ या जागेसाठी ४ अर्ज दाखल झाले होते़ मात्र छाननीत ३ अर्ज फेटाळण्यात आल्याने एकमेव उमेदवार शिल्लक होता़ मात्र दुसºया उमेदवाराचा अर्ज न्यायालयाने वैध ठरविल्याने आयोगाने या संपूर्ण प्रभागासाठी (अ,ब,क,ड) सुधारीत कार्यक्रम जाहीर केला़ मात्र नंतर दुसºया उमेदवाराचा अर्ज पुन्हा अवैध ठरविण्यात आला़ सुधारीत कार्यक्रमानुसार उमेदवारांना गुरूवारी चिन्हवाटप करण्यात आले़ समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह देण्यात आले़  चिन्ह वाटप प्रक्रियेमुळे शाळा क्रमांक ५ प्रभाग कार्यालयात उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केली होती़ 

Web Title: Marking candidates in ward 12

टॅग्स :Dhuleधुळे