मार्केट प्रशासन व्यापाºयांपुढे झुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:28 IST2019-05-09T22:27:24+5:302019-05-09T22:28:52+5:30
पिंपळनेर उपबाजार समिती : शेतकºयांची हित लक्षात घेता कांदा खरेदी; दीडशे पेक्षा अधिक वाहने दाखल

dhule
पिंपळनेर : उपबाजार समिती बंदची घोषणा मार्केट प्रशासनाने घेतली होती. मात्र व्यापाºयांनी सदर घोषणेला धुडकावत कांदा व भुसार मार्केट सुरू राहील, असे सांगून व्यापाºयांनी शेतकºयांचे हीत लक्षात घेत कांदा खरेदी केल्यामुळे मार्केट प्रशासन व्यापाºयांपुढे झुकल्याचे दिसून आले. कांदा लिलावस्थळी मार्केटचे सचिव शाखाप्रमुख व कर्मचारी यांच्या उपस्थितीत लिलाव झाला.
उपबाजार समितीचे बंदचे आवाहन करुनही आज दीडशे पेक्षाही जास्त कांद्याची वाहने शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणले होते. पण व्यापाºयांनी मार्केट बंदचा निर्णय धुडकावत माल खरेदी सुरू राहील व शेतकºयांनी माल विक्रीसाठी आणावे, असे आवाहन केले होते.
व्यापाºयांनी मार्केटच्या निर्णयांना धाब्यावर बसवत लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले. याचवेळी मार्केटचे कर्मचारीही उपस्थित राहिल्याने मार्केट प्रशासनाला व्यापाºयांपुढे झुकावे लागले. संपूर्ण लिलाव प्रक्रिया उपबाजार समितीत शांततेत पार पाडण्यात आली. यावेळी व्यापाºयांनी कांद्याला ६०० ते ९५० रुपये क्विंटलपर्यंत भाव देण्यात आला. यावेळी व्यापाºयांनी शेतकºयांचे हित लक्षात घेत माल खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली, असे सांगण्यात आले.
व्यापाºयांवर हमाल मापाडी त्यांच्या गोडाऊनवर चालून येता. व्यापारी मार्केट प्रशासनाकडूनही त्या संदर्भात व्यापाºयांना दुजोरा मिळत नाही. व्यापारी पोलीस स्टेशनात जाऊनही संरक्षणाची मागणी करतात. मग व्यापाºयांना संरक्षण मिळाले का? मग व्यापाºयांना संरक्षण नको का? हमाल मापाडींचा प्रश्न निकाली निघत नाही, दोन महिन्यापासून त्यांना काम नाही हा प्रश्न कोणी सोडवावा, असाही प्रश्न निर्माण होतो. मार्केट प्रशासन, सभापती, संचालक मंडळ डोळ्यादेखत फक्त बघण्याची भूमिका घेत असले तरी भविष्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवता येत नाही. या वदात शेतकºयाची कुचंबणा होते.
मार्केट प्रशासनात एकसूत्रता नाही...
गेल्या दोन महिन्यापासून हमाल मापाडी यांचा प्रश्न निर्माण झाला असून व्यापारी खासगी हमालांमार्फत काम करुन घेत आहेत. मार्केट प्रशासन, व्यापारी व हमालमापाडी या सर्वांमध्ये एक वाक्यता दिसत नसल्याने मार्केट प्रशासन हमाल मापाडींचे खापर व्यापाºयांवर फोडत आहे. तर व्यापारी मार्केट प्रशासन व हमालांवर, कधी मार्केटच्या कर्मचाºयांना शेतकरी लिलाव स्थळापासून हाकलून लावतात. यात मार्केट प्रशासनाचा अपमान झाला, असे सांगत मार्केट बंदचे आवाहन करतात, एकही व्यापाºयांने आपले कागदपत्रांची पुर्ननोंदणी केलेली नाही. मग मार्केट प्रशासनाने आज व्यापाºयांना कांदा लिलाव कसा करु दिला? सेम डेट चेक व रोख पेमेंटचे आवाहन करण्याचे मार्केट ठरवूनही मार्केट प्रशासनाचा एकही निर्णय मान्य न होता असे दिसून आले की मार्केट प्रशासनात एकसूत्रता नाही, ही निंदनीय बाब म्हणावी लागेल.