मराठे विद्यालयात रंगला ७०० बालकलाकारांचा नृत्यविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:24 IST2020-03-04T12:21:56+5:302020-03-04T12:24:42+5:30
पाच डिजिटल वर्गांचे उद्घाटन : ‘केसावर फुगे’गीताने घातली भुरळ

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : शहरातील आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ७०० बाल कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात पाच डिजिटल वर्गांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाुहणे म्हणून खासदार डॉ.सुभाष भामरे, जि.प. उपाध्यक्षा कुसुम निकम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक संजय चौधरी, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते व नगरसेवक अनिल वानखेडे, जि.प. सदस्य वीरेंद्र्र गिरासे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रा.आर.जी. खैरनार, उपनगराध्यक्ष भिला पाटील, उल्हास देशमुख, संस्थाध्यक्ष साहेबराव मराठे, गायक व अभिनेते अण्णा सुरवाडे आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील पाच डिजीटल वर्गांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
आता शाळेतील डिजिटल वर्गांची संख्या १० झाली आहे. यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अमोल मराठे यांनी प्रास्ताविकात मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात गाजलेले केसावर फुगे या गाण्याचे गायक व अभिनेते अण्णा सुरवाडे यांनी प्रेक्षकांमधून सायकलवरून प्रवेश करत ‘फुगे घ्या फुगे’ हे गीत गात नृत्य देखील केले. यामुळे विद्यार्थी आणि सर्व प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले.
७०० बालकलाकारांनी संस्कृती, देशभक्तीपर गाणी, शेतकऱ्याची व्यथा, पंढरीची वारी, जागरण गोंधळ, व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूणहत्या, शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र नाटकातून आणि गीतातून सादर केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.