सरपंचपदासाठी अनेकांनी लावली फिल्डींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:00+5:302021-02-05T08:47:00+5:30
सध्या गावागावात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठकांवर जोर वाढलेला दिसून येत आहे़ दहिवद, मांडळ, होळ, भाटपुरा, शिंगावे, विखरण, सावळदे यांसह ...

सरपंचपदासाठी अनेकांनी लावली फिल्डींग
सध्या गावागावात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठकांवर जोर वाढलेला दिसून येत आहे़ दहिवद, मांडळ, होळ, भाटपुरा, शिंगावे, विखरण, सावळदे यांसह अनेक गावांमधील निवडणुकी चुरशीच्या झाल्या आहेत़ तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे़ त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने देखील काही ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे़
भाजपाचे सरकार सत्तेत असतांना सरपंचपद थेट जनतेतून निवडून जात होते़ आता मात्र निवडून आलेल्या सदस्यांमधूनच तीही निवडणुकीनंतर सरपंचाची निवड होणार आहे़ मतमोजणीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली़ त्यातही महिला आरक्षण येत्या सोमवारी काढण्यात येणार आहे़
लोकप्रतिनिधींकडे उमेदवारांच्या चकरा वाढल्या़
ग्रामपंचायत म्हणजे गावचे मिनी मंत्रालय असते़ विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतकडे येतो़ त्यामुळे सरपंच आपल्याच मर्जीतील असावा, सरपंचपदाची संधी मलाच मिळावी अशी अपेक्षा नवीन प्रत्येक सदस्यांची असून, अनेकांची छुप्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे़
विशेष करून भाजपातील निवडून आलेल्या सदस्यांनी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जि़प़चे अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे यांच्याकडे भेटी घेण्यास सुरुवात केलेली दिसते़
पदांची होणार वाटणी़
आरक्षणामुळे प्रत्येक गावात विजयी उमेदवार पदासाठी इच्छूक आहेत़ निवडून आलेल्यांना सांभाळून ठेवण्यासाठी गावकारभारीºयांना सरपंच, उपसरपंचपदाची वाटणी करावी लागणार आहे़ आघाडी फुटण्यापेक्षा वाटणीच महत्वाची ठरेल अशी मानसिकता झाली आहे़ काही गावांमध्ये सरपंचपद आरक्षित झाल्यामुळे उपसरपंचपद अडीच वर्षे तर काही ठिकाणी एका वर्षाकरिता करण्यात येणार असल्यामुळे अनेकांना संधी मिळणार आहे़
अनेक सदस्य फिरायला़
काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये मतमोजणी झाल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित सदस्यांबरोबर पॅनल प्रमुख सहलीला गेले आहेत़ रम्य स्थळी खाओ, पिओ, मजा करो पण सरपंचपद आपल्याकडेच पायजेल यासाठी मोफत पर्यटन सुरू केल्याचे सांगण्यात येते़ गुरुवारी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले, मात्र त्यातही अद्याप स्त्री की पुरुष ते अद्याप निघालेले नाही़ ते येत्या सोमवारी निश्चित होईल़ सरपंचपदाच्या निवडीकरीता तारीख जाहीर होईल, त्यानंतर ते सदस्य परतणार असल्याचे सांगण्यात येते़