तब्बल १ लाख बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:34 IST2020-07-12T12:32:10+5:302020-07-12T12:34:48+5:30

धुळे जिल्हा : लॉकडाऊन काळात बेरोजगार झालेल्या तरूणांना रोजगार मिळवून देण्याचा रोजगार केंद्राचा प्रयत्न

As many as 1 lakh unemployed are waiting for employment | तब्बल १ लाख बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षा

dhule

ठळक मुद्देदोन दिवस आॅनलाईन रोजगार मेळावा१६ जुलै रोजी आॅनलाइन रोजगार मेळावात्रैमासिक विवरणपत्र ३० दिवसांच्या आत सादर जिल्ह्यात नरडाणा व अवधान औद्यागिक वसाहतीमध्ये २८० ते ३०० उद्योग

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अडीच महिण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले़ त्यामुळे या काळात जिल्ह्यातील अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे़ स्थानिक ठिकाणी रोजगार मिळावा, यासाठी गत चार वर्षात १ लाख ४०७ तरुणांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्रात नाव नोंदणी केली आहे़
शैक्षणिक पात्रता पुर्ण झाल्यावर स्थानिक ठिकाणी नोकरी व रोजगार उपलब्ध नसल्याने दरवर्षी हजारो तरूण नोकरी व रोजगाराचा आशेवर पुणे, मुंबई, नाशिक, नगर तसेच अन्य जिल्ह्यासह देशात स्थालांतर करतात़ मात्र लॉकडाऊनमुळे देशातील उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने परजिल्ह्यात गेलेल्या तरूणांना जिल्ह्यात परतावे लागले आहे़ अनलॉक पहिल्या टप्यात उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत़ मात्र रोजगार व नोकरी हातून गेल्याने अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे़ त्यामुळे अनेकांनी नोकरीच्या अपेक्षित संधी उपलब्ध होण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे नोदणी केली आहे़
पुणे, मुंबई नको रे बाबा
पुणे, मुंबई शहरात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे़ त्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक जिल्हास्तरावर रोजगार मिळण्याची अपेक्षा आता पुणे, मुंबई व अन्य शहरातून परतल्या तरूणांकडून होत आहे़ त्यासाठी रोजगार केंद्रात स्थानिक जिल्ह्यात रोजगार मिळण्याची अपेक्षा तरूणांकडून होतांना दिसुन येत आहे़
दरवर्षी नोंदणीत होते वाढ
जिल्ह्यातच रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात गत चार वर्षात २५ हजार ३१७ महिला तर ७५ हजार ९० पुरूष अशा १ लाख ४०७ तरूणांना नोकरीची प्रतीक्षा आहे़ लॉकडाऊन काळात अन्य जिल्ह्यातून स्वजिल्ह्यात परतलेल्या ८२८ तरूणांनी रोजगार केंद्रात आॅनलाईन नोकरीसाठी नोंदणी केली आहे़
रोजगारासाठी केंद्राचे प्रयत्न
लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात राज्यातील हजारो कामगारांचे स्थालांतर झाले आहे़ बहूसंख्य ठिकाणी कामगारांची गरज निर्माण झाली आहे़ स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आदेश कौशल्य विकास, रोजगार केंद्राला प्राप्त झाले आहेत़ त्यासाठी अवधान व नरडाणा येथील औद्यागिक वसाहतीत आवश्यक असलेल्या कामगार, पदे अन्य माहिती मागविली जात आहे़ त्यामुळे रोजगार केंद्रामार्फेत स्थानिक व अन्य जिल्ह्यात रोजगार मिळवून देण्यासाठी सध्या प्रयत्न होतांना दिसत आहे़
उद्योजकांची होईल चर्चा
जिल्ह्यात नरडाणा व अवधान औद्यागिक वसाहतीमध्ये २८० ते ३०० उद्योग आहेत. या उद्योगाचा विस्तार देशभरात आहे़ राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह खान्देशातील हजारो कामगारांचे स्थालांतर झाल्याने उद्योजकांना कामगारांची गरज आहे़ तर जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराची यासाठी रोजगार केंद्र व उद्योजकांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत नियोजन सुरू आहे़ बैठकीनंतर रिक्त पदांची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक तरूणांना नोकरीच्या संधी मिळणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली़
अनेक युवक आत्मनिर्भर
कोरोनामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले़ आपल्या जिल्हयात व आपल्या गावात राहून नवीन उद्योग, व्यवसाय उभारणी करता यावी, यासाठी जिल्ह्यातील अनेक तरूणांनी आत्मनिर्भर होण्यासाठी जिल्हा उद्योग केद्राकडे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केलो आहे़
दोन दिवस आॅनलाईन रोजगार मेळावा
लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उद्योग बंद होते. या आस्थापनांमध्ये काम करणारे श्रमिक त्यांच्या गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापनांना व्यवसाय उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. त्यासाठी १५ व १६ जुलै रोजी आॅनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र सरकार व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगीकृत अद्योग/ व्यवसाय/ महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा, नगरपालिका तसेच खासगी क्षेत्रातील २५ किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी काम करत असतील, अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखान्यांनी रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा व त्या अंतर्गत नियमावलीनुसार सेवायोजना कार्यालयास त्रैमासिक विवरणपत्र ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.

Web Title: As many as 1 lakh unemployed are waiting for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे