शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मनोज मोरेंकडून भाजपला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:21 IST

महापालिकेवर तोंडसूख : कोरोनाचा फैलाव तर पाणी असूनही टंचाई

धुळे : महापालिकेचा निष्क्रीयपणा आणि लचके तोडणाऱ्या प्रशासनामुळे धुळ्यात कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक, भाजप नेते मनोज मोरे यांनी केला आहे़ त्यांनी केलेल्या या आरोपामुळे भाजपलाच त्यांनी घरचा आहेर दिल्याचे स्पष्ट होत आहे़धुळे शहरात कोरोना या महामारीने अतिशय मजबूत असे जाळे विणले आहे़ या भयंकर परिस्थितीतून धुळेकर नागरिकांना सांभाळण्याची प्रमुख जबाबदारी महापालिकेची आहे़ परंतु या विषयात पूर्णपणे अयशस्वी झाली असून यास सर्वस्वी पालिकेचे प्रशासन जबाबदार आहे़ शहरात कोरोना या महामारीशी लढण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना सुरू आहेत, त्यात फवारणी करणे, परिसर निजंर्तुक करणे, परिस्थतीनुसार हॉटस्पॉट किंवा कॅन्टेन्मेंट झोन तयार करणे, भागाभागात बॅरिकेटिंग करणे हे जरी सर्व होत असेल तरी देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्री ते पालिका प्रशासन जनतेत वेळोवेळी अणि परत परत हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करत आहेत़ त्यात आपल्या महापालिकेचाही जोर स्वच्छ हात धुण्यावर जास्त आहे़ परंतु खेदाने सांगावेसे वाटते की धुळे शहराच्या जनतेला ८ ते १० दिवस नळांना पाणी देत नाही़ जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी महापालिका हाल करते आहे़ तर मग जनता हात कसे धुणार? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला़ शहराला पाणी पुरवठा करणारे स्तोत्र कोरडे आहेत त्यामुळे महापालिका पाणी देऊ शकत नाही, अशीही परिस्थिती नाही़ उलट गेल्या वर्षी वरुण राज्याच्या कृपेने खूप पाऊस झाला़ सर्व नद्या, नाले, तलाव, बंधारे, धरण ओसंडून वाहिले व आजही या वर्षी पाऊस झाला नाही तरी पाणीटंचाई भासणार नाही़ अशी परिस्थिती आहे़ नकाने तलावात खूप पाणी आहे़ अक्कलपाडा धरण या वर्षी पहिल्यांदा ओसंडून वाहत आहे़ तिखी आणि नकाणे तलावात भरपूर प्रमाणात पाणीसाठी उपलब्ध आहे़ तरी देखील धुळेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ नागरिक वेळेवर टॅक्स भरतात़माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष महाजन, जयकुमार रावल, डॉ़ सुभाष भामरे यांनी कायम पाणीटंचाईला कंटाळलेल्या जनतेला विश्वास देऊन रोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते़ व जनतेनेही नेत्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कधी नव्हे इतकं घवघवीत ५० पेक्षा अधिक नगरसेवक भाजपच्या पारड्यात टाकून धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासह नागरी सुविधांच्या अपेक्षा केल्या आहेत़ त्यामुळे जनतेत नेत्याविषयी व पक्षा विषयी नाराजीचा सूर उमटत असून भाजपही इतर पक्षासारखाच खोटे आश्वासन देणारा पक्ष असल्याच्या भावना जनतेच्या होऊ लागल्या आहेत़ त्यामुळे भाजपा पक्ष देखील बदनाम होतो आहे, अशी आक्रमक भावना मोरे यांनी व्यक्त केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे