मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला आॅगस्टमध्ये सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:17 IST2018-07-13T13:15:55+5:302018-07-13T13:17:30+5:30
धुळे ते नरडाणा पहिला टप्पा : निविदा प्रक्रिया राबविली जाणार

मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला आॅगस्टमध्ये सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बहुप्रतिक्षित असलेल्या मनमाड - इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे़ त्यात पहिल्या टप्प्यात धुळे ते नरडाणा मार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
मनमाड इंदूर रेल्वे मार्गासंदर्भात डॉ़ सुभाष भामरे यांनी एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली़ यावेळी अनुप अग्रवाल, विनोद मोराणकर, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, डॉ़ माधुरी बाफना यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़
डॉ़ भामरे यांनी शहराचे आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता विरोधक माझ्यावर खोटे आरोप करतात़ त्यांच्या उत्तरांमध्ये मी माझा वेळ खर्च न करता विकास काम करत राहणार आहे़ रेल्वे मार्गासाठी मुंबई आणि दिल्ली या ठिकाणाहून वेळोवेळी पाठपुरावा होत असतो़ पुराव्यांशिवाय मी बोलत नाही़ माझ्यावर होणाºया आरोपांकडे लक्ष दिल्यास विकास कधी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला़