मालपूलाPPPPP डेंग्यूने काढले वर डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:43 IST2021-09-10T04:43:29+5:302021-09-10T04:43:29+5:30
या अगोदर येथील मोठे महादेव मंदिर परिसरात रुग्ण आढळून आले होते तर आता प्राथमिक आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर असलेल्या ...

मालपूलाPPPPP डेंग्यूने काढले वर डोके
या अगोदर येथील मोठे महादेव मंदिर परिसरात रुग्ण आढळून आले होते तर आता प्राथमिक आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर असलेल्या रावलनगरात डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आता डास निर्मूलन मोहीम हाती घेणे गरजेचे आहे आहे तर डासांच्या निर्मितीला जबाबदार नागरिक, संस्थाना नोटिसा बजावल्या पाहिजे. कारण यामुळे दुसऱ्यांना भोग भोगावा लागत असल्यामुळे येथील सुजाण नागरिक संतप्त झालेले दिसून येत आहेत.
मालपूरमध्ये कोरोनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. जणू येथून कोरोना हद्दपार झाला असून पुन्हा येणारच नाहीत अशा अविर्भावात सर्वच दिसून येतात. जबाबदार व्यक्तींच्या तोंडाला देखील मास्क दिसून येत नाही यामुळे सर्वसामान्य नागरिक हेवा करताना दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग विसर पडुन सार्वजनिक कार्यक्रम व अंत्यसंस्कारात वाढत्या गर्दीचा लोंढा दिसुन येतो. यामुळे नजीकच्या काळात याची किंमत मोजावी लागेल याची भीती वाटु लागली आहे. संकटातुन गावकरी पुरते निघत नाही, तोपर्यंत डेंग्यूने दुसऱ्यांदा आक्रमक केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरत असून या डेंग्यूचा अधिक फैलाव होवू नये म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा डेंग्यूचे थैमान उभे राहून आगीतून निघुन फुफाट्यात पडल्यासारखी ग्रामस्थांची गत होणार आहे.
तालुक्यातील मालपूर येथील रावलनगर भागात लहान मुलीला डेंग्यूची लागण झाली. एका खासगी रुग्णालयात उपचार करून बालकांची सुट्टी झाल्याचे समजते. डॉक्टरांनी या मुलीची तपासणी केली असता, डेंग्यूसदृश परिस्थिती दिसुन आली. यामुळे रक्त, लघवीचे विविध नमुने घेवुन तपासणी केली असता आलेल्या तपासणी अहवालावरुन डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सध्या या परिसरात भितीचे वातावरण पसरत आहे. यासाठी आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना योजून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मालपूर सध्या ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसुन येत आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा, गावातील सर्वच गटारी वाहत्या कशा असतील याची काळजी घ्यावी. तर आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडण्याचे नियोजन झाले पाहिजे.
यासंदर्भात गावातील आरोग्य विभाग अनभिज्ञ असुन त्वरित शोध मोहीम हाती घेवुन डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना संदर्भित करणे आवश्यक आहे. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यावर आढळुन येत असल्यामुळे पाण्याने भरलेली टाकी, ड्रम वेळोवेळी स्वच्छ करून ग्रामस्थांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी याकाळात घेतली पाहिजे, गरज नसेल तर विनाकारण पाण्याचा साठा करु नये.
सार्वजनिक ठिकाणावरील डबक्यात आॅइल टाकुन निर्जंतुकीकरण देखील करणे गरजेचे असल्याचे गावातील गल्ली बोळात दिसुन येत आहे. यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य विभागाने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथे सध्या तीन डाॅक्टर असल्याचे समजते मात्र मुख्यालयी एकही राहत नाही. पावसाळ्याचे दिवस असून सर्दी, खोकलाचे व्हायरल रुग्णांची खासगी दवाखान्यात रांगा लागल्या आहेत. त्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र ओस दिसून येते. येथे फक्त लसीकरणाची गर्दी होताना दिसून येत आहे.