जमिनीच्या मोबदल्यासाठी ठराव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 10:52 IST2018-02-20T10:51:25+5:302018-02-20T10:52:29+5:30

निलम गोºहे : शेतकरी धर्मा पाटील यांच्या परिवाराचे सात्वंन

Make a resolution for the cost of the land | जमिनीच्या मोबदल्यासाठी ठराव द्या

जमिनीच्या मोबदल्यासाठी ठराव द्या

ठळक मुद्देशिवसेनेच्या निलम गोºहे यांची विखरणला भेटधर्मा पाटील यांच्या परिवाराशी केला संवादग्रामस्थांच्या जाणून घेतल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : विखरण येथील प्रकल्पबाधीत शेतकºयांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी ग्रामसभेचा ठराव करावा आणि तो आमच्याकडे पाठवावा़ त्याआधारे विधानसभेत बाजू मांडता येईल असे शिवसेनेच्या आमदार तथा पक्ष प्रवक्त्या निलम गोºहे यांनी सांगितले़ 
शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे धर्मा पाटील यांच्या परिवाराचे सात्वन करण्यासाठी आमदार निलम गोºहे यांनी सोमवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास भेट घेतली़ ग्रामस्थांशीही संवाद साधला़ त्यांच्यासमवेत माजी आमदार प्रा़शरद पाटील, हेमंत साळुंखे, अतुल सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, छोटू पाटील, विश्वनाथ पाटील, कल्याण बागल, प्रविण पाटील यांच्यासह अन्य शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते़ 
गोºहे यांनी धर्मा पाटील यांच्या परिवाराला शासनाकडून योग्य तो न्याय आणि मोबदला मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले़ 

Web Title: Make a resolution for the cost of the land