माझी वसुंधरा अभियान यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:30+5:302021-09-11T04:37:30+5:30
धुळे जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान टप्पा २ सर्व तालुक्यात प्रभावीपणे जिल्हा परिषद धुळेच्या वतीने ग्रामपातळीवर राबविण्यात येत आहे.याबाबत बोलताना ...

माझी वसुंधरा अभियान यशस्वी करा
धुळे जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान टप्पा २ सर्व तालुक्यात प्रभावीपणे जिल्हा परिषद धुळेच्या वतीने ग्रामपातळीवर राबविण्यात येत आहे.याबाबत बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे म्हणाले की, हे अभियान न राहता लोकाभिमुख चळवळ उभी राहायला पाहिजे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, विशेषतः निसर्गप्रेमी संघटना, निसर्गप्रेमी व्यक्ती, तरुण युवक युवती, अध्यात्मिक संप्रदाय, डॉक्टर, वकिल यांनी सहभागी व्हावे, वसुंधरा संवर्धन हि आजची निकड आहे, असमतोल नैसर्गिक वातावरण हा निसर्ग कोपाचा एक भाग आहे. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनीही सहभागी होऊन सुटीच्या दिवशी श्रमदान करून वृक्षारोपण व संवर्धन करावे, माझी वसुंधरा अभियान टप्पा 2 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, तरुण मित्र मंडळ, गणेश मंडळातील युवाशक्तीने, वारकरी संप्रदाय, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवक, सर्व शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना या सर्वांनी गावपातळीवर संयुक्तिक संकल्पना प्रभावीपणे राबवून अभियान निश्चित यशस्वी होईल याची खात्री आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुमनिकम, सभापती सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व खाते प्रमुख उपस्थितीत होते.