शहरात सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:11 IST2019-07-07T22:10:48+5:302019-07-07T22:11:46+5:30

डॉ़ सुभाष भामरे : पदाधिकाऱ्यांना आवाहन

 Make the Member Registration Campaign successful in the city | शहरात सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करा

dhule

धुळे : भारतीय जनपा पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे़ या अभियानात नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय यशस्वी नोंदणी करावी असे आवाहन खासदार डॉ़ सुभाष भामरे यांनी केले़
व्यंकटेश लॉनमध्ये सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात शनिवारी करण्यात आली. या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, सदस्य नोंदणी अभियानाचे जिल्हा प्रमुख नगरसेवक हिरामण गवळी, हर्षल विभांडिक, महानगर संयोजक जयश्री अहिरराव, डॉ. माधुरी बोरसे, स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील, विनोद मोराणकर आदी उपस्थित होते़ नोंदणीसाठी चार प्रकारची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल करणे, आॅनलाइन पध्दत, आॅफलाइन आणि मोबाइलद्वारे सदस्य नोंदणी करण्यात येत आहे.
शहरात ५० हजार सदस्यांची नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात किमान एक हजार सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे़

Web Title:  Make the Member Registration Campaign successful in the city

टॅग्स :Dhuleधुळे