३६ हजार ८२३ बाधितामध्ये २० हजार ७६ कोरोना बाधित रूग्ण हायरिक्स मध्ये असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली.
आठ महिन्यात महानगरातील बाधितांचा आकडा वाढला
धुळे महानगरात सध्या १२ हजार १६३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १५ हजार ६९ ॲक्टीव रूग्ण आहेत. त्यापैकी १० हजार ४१० बाधित उपचारानंतर बरे झालेले आहेत. तर २२३ रूग्णांना कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दरम्यान १ ऑगस्ट २०२० ते २७ मार्च २०२१ आठ महिन्याच्या कालावधीत कोरोना बाधितांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेर २ हजार २३३ बाधित आढळून आलेे होते. तर ८८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होतो. सप्टेबर महिन्यात २ हजार १४९ बाधित आढळले तर ४२ जणांना मृत्यू झाला होतो. ऑक्टोबर महिन्यात ८६३ बाधित, सात कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू, नोव्हेबर महिन्यात १६६ कोरोना बाधितांपैकी एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नव्हता. डिसेबर २०२० महिनाअखेर २४६ कोरोना बाधित आढळले हाेते. त्यापैकी पाच बाधित रूग्णांचा मृत्यू झाला होतो. जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यात ४ हजार ५७४ कोरोना बाधित रूग्णांची भर महानगरात पडली आहेत. या तीनही महिन्यात दहा कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
महानगरात ३६ हजार ८२३ रूग्ण हाय व लो रिक्समध्ये घेताय उपचार
महानगरातील सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रूग्णामध्ये हायरिक्समधील रूग्ण २० हजार ७६ रूग्ण हायरिक्समध्ये तर १८ हजार ४०२ रूग्ण लाेरिक्स असे दोन्ही मिळून ३६ हजार ८२३ रूग्ण आहेत. हाय व लोेरिक्स कोरोना बाधितांची टक्का महानगराचा ९.७६ आहे. या बाधितांवर सरकारी व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.