आगामी पाच वर्षात महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:30 IST2019-08-23T11:29:25+5:302019-08-23T11:30:19+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांची दोंडाईचा येथे सभा : आता स्पर्धा देशातील राज्यांशी नव्हे तर युरोप राष्टÑांशी करणार

 Maharashtra will make drought free in the next five years | आगामी पाच वर्षात महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार

आगामी पाच वर्षात महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेनिमित्त झाली सभामुख्यमंत्र्यांनी यात्रेचा उद्देश केला स्पष्ट

आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या पाच वर्षात जलसिंचनाची अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. आगामी काळात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्टÑ दुष्काळमुक्त केला जाईल. तसेच अक्कलपाडा, सुलवाडे-जामफळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याला यापुढे कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. दरम्यान आगामी काळात महाराष्टÑाला सर्वच क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा येथील जाहीर सभेत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचा दुसरा टप्पा गुरूवारपासून धुळ्यातून सुरूवात झाला. यानंतर दोंडाईचा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा खा. डॉ. सुभाष भामरे, अशोक कांडेलकर, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुमार कुंवर, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, डॉ. माधुरी बोरसे आदी उपस्थित होते.
पाचवर्षात केलेली विकास कामे जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने युतीच्या हाती सत्ता सोपविली. या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. मात्र प्रत्येक आव्हानाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले. गेल्या पाच वर्षात राज्य उद्योग, रोजगार क्षेत्रात पहिल्याक्रमांकावर आणले. तर आरोग्य आणि शिक्षणाच्याबाबतीत राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आगामी काळात शिक्षण क्षेत्रातही महाराष्टÑ आघाडीवर असेल.
दुष्काळ, बोंडअळी यामुळे राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीत आला. मात्र या अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सिंचनाच्या क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडवून आणले. जिल्ह्यातील सुलवाडे-जामफळ हा महत्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र मोदींनी या प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे आगामी काळात हे प्रकल्प पूर्ण होवून हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. अक्कलपाडा, सुलवाडेच्या माध्यमातून या भागाला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.
 

Web Title:  Maharashtra will make drought free in the next five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे