शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:35 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच अनेकांनी मैदानात उतरण्याची तयारी केली होती. त्यामु‌ळे बंडखोर, अपक्षांची संख्या वाढणार, असे दिसत होते.

धुळे जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघा बंडखोर उमेद‌वारांमुळे प्रस्थापितांसमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत त्यांच्यामुळे निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच अनेकांनी मैदानात उतरण्याची तयारी केली होती. त्यामु‌ळे बंडखोर, अपक्षांची संख्या वाढणार, असे दिसत होते. मात्र, धुळे शहर वगळता धुळे ग्रामीण, साक्री आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघांत बंडखोरी कायम आहे. 

काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे. सुरुवातीला सरळ वाटणाऱ्या या लढ़ती आता तिरंगी, चौरंगी होतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे महविभाजन अटळ आहे. हे मत विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरते आणि कोणासाठी डोकेदुखी हे मात्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

साक्री मतदारसंघ : स्पर्धक तेच, झेंडे बदलले 

साक्री विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १८ उमेवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. १८ उमेदवारांपैकी ११ जण अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. याठिकाणी महायुती आहे. भारतीय जनता पक्षाचे साक्री विधानसभा मतदारसंघाचे प्रचारक मोहन सुर्यवंशी हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे अधिकृत उमेदवार होते. तर विद्यमान आमदार मंजुळा गावीत यांना भाजप सोडून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी केली होती. यंदाही हे दोन्ही उमेदवार आमने सामने आहेत. काँग्रेसतर्फे नवीन चेहरा माजी खासदार बापू चौरे यांचे चिरंजीय शिक्षक प्रविण चौरे यांना उमेदवारी दिली आहे. 

शिरपूरला पंजा दिसणार नाही 

शिरपूर विधानसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीतर्फे प्रथमच ही जागा भाकपला सोडली आहे. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. इतिहासात प्रथमच या मतदारसंघात काँग्रेसचे चिन्ह दिसणार नाही. भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार काशिराम पावरा यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार आहे

धुळे शहरात चौरंगी लढत 

धुळे शहर एकमेव मतदारसंघ आहे. याठिकाणी कुठल्याही पक्षात बंडखोरी झालेली नाही. परंतू याठिकाणी महायुतीतर्फे भाजपने नवीन हिंदुत्वादी तरुण चेहरा अनूप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्धवसेनेने माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीने नवीन चेहरा इर्शाद जहागिरदार आणि एमआयएमने विद्यमान आमदार फारुख शाह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी होणारी मतांची विभागणी ही कोणाच्या पथ्यावर पडेल आणि कोणाचे नुकसान करेल, हे निकालानंतर समजेल.

जरांगे फॅक्टरचीही धास्ती 

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत उमेदवार उभे करणार नसून, गनिमी कावा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टरचाही लढतीवर परिणाम होणार आहे. त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार असून जरांगे फॅक्टरचीही धास्ती कायम आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dhule-city-acधुळे शहरsakri-acसाक्रीshirpur-acशिरपूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhuleधुळे