महानगर एलईडी पथदिव्यांनी उजळणार, १० रस्त्यांवर महिन्यात हजार एलईडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:33+5:302021-06-16T04:47:33+5:30
महात्मा गांधी चौकातून या कामास प्रारंभ झाला. रस्त्याची रुंदी व आवश्यकतेनुसार त्या त्या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात येतील. मनपा हद्दीत ...

महानगर एलईडी पथदिव्यांनी उजळणार, १० रस्त्यांवर महिन्यात हजार एलईडी
महात्मा गांधी चौकातून या कामास प्रारंभ झाला. रस्त्याची रुंदी व आवश्यकतेनुसार त्या त्या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात येतील. मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतही नवीन पथदिवे लावले जातील. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा पाच वर्षांचा ठेका दिला आहे. शहरातील संपूर्ण पथदिवे बदलवून नवीन एलईडी पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव यापूर्वी मंजूर झालेला होता. धुळे शहरातील हद्दवाढ क्षेत्रासह एकूण सद्य:स्थितीत असणाऱ्या १५ हजार ७२२ विद्यृत खांबावर असणारे जुने पथदिवे, तसेच कंट्रोल पॅनल बदलून त्याठिकाणी क्राप्टन कंपनीचे पथदिवे बसविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव, महिला बालकल्याण समितीच्या सभापती वंदना थोरात, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्षनेते साबीर शेख, नगरसेवक वंदना भामरे, प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी, देवेंद्र सोनार, रंगनाथ भील, भगवान गवळी, नरेश चौधरी, युवराज पाटील, दगडू बागूल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागुल, भगवान देवरे, ओमप्रकाश खंडेलवाल आदी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर पथदिवे
पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी पुतळा ते गुरुद्वारा, पंचवटी ते नगावबारी, गुरुशिष्य स्मारक ते मोतीनाला, मनपा ते कृषी महाविद्यालय, शिवाजी महाराज यांचा पुतळा ते चाळीसगाव चौफुली, शिवतीर्थ ते फाशी पूल ते बारा पत्थर, फाशी पूल ते क्रांती चौक, दूध डेअरी रोड ते चितोड रोड, वरखेडी रोड, गल्ली नंबर १, ५, ६, ७ व जे. बी. रोडवर पथदिवे लागतील. आश्यकतेनुसार त्या त्या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात येतील. मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतही नवीन पथदिवे लावले जातील. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा पाच वर्षांचा ठेका दिला आहे.
आठ महिन्यांत सर्व पथदिवे बदलणार
जून व जुलैदरम्यान २ हजार, तर रोज २०० पथदिवे लागतील. शहरातील सर्व भागांतील पथदिवे आठ महिन्यांत बदलण्यात येतील. एकूण १५ हजार पथदिवे आहेत.