शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

जेवणापूर्वीच मायलेकींवर काळाचा घाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:46 IST

आई अनिता होती गरोदर : महिन्यापूर्वीच धुळे तालुक्यातील वरखेडे येथे आले होते वास्तव्याला

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यूनशीब बलवत्तर म्हणून कर्ता पुरूष बचावलादुर्दैवी घटनेने समाजमन हळहळले 

सुरेश विसपुते । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुलींसाठी आईने संध्याकाळी भात, भाजी-भाकरी असा स्वयंपाक करून ठेवला होता. मात्र त्याचा आस्वाद घेण्यापूर्वीच आईसह तीन बालिकांवर काळाने घाला घातला. यातील आई अनिता चौथ्यांदा गरोदर होती. शहरापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या वरखेडी येथे शनिवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. गावालगतच्या शेतात वास्तव्याला असलेल्या पावरा कुटुंबातील या चार मायलेकींचा चिंचेच्या झाडाखाली दबून झालेल्या मृत्यूने समाजमनाला चटका बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.  शनिवारी संध्याकाळी परिसरात पाऊस होईल अशी अपेक्षा नसताना थोड्याच वेळात वातावरण तयार होऊन संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्या मागोमाग घोंगावत आलेल्या चक्रीवादळामुळे तासाभरात होत्याचे नव्हते केले. अनेक झाडे कोसळली. त्यात शेतकरी प्रभाकर गुजर यांच्या गावालगत असलेल्या चिंचेच्या झाडाचाही समावेश होता. महिनाभरापूर्वीच दादूराम जामा पावरा (३२) हा सालदार म्हणून प्रभाकर  गुजर यांच्याकडे रुजू झाला होता. त्याच्यासोबत पत्नी अनिता (२८) व वशिला पावरा (३), पिंकी पावरा (२) व रोशनी (१) या तीन मुली  येथे राहण्यास आल्या. शेतातच चिंचेच्या मोठ्या झाडालगत तुरकाठ्यांच्या भिंंती उभारून सिमेंट पोलच्या आधाराने पत्र्याचे घर उभे राहिले. त्यात पावरा कुटुंब राहत होते. वशिला वगळता पिंकी व रोशनी यांना अद्याप समजही आलेली नव्हती. आई-वडील शेतात काम करत तेव्हा वशिला या दोघी बहिणींना सांभाळत असे. शनिवारी संध्याकाळी काम आटोपल्यानंतर अनिताने मुलींसाठी भात, भाजी व भाकरी असा स्वयंपाक केला. थोड्या वेळाने जेवण करू असा विचार करून अनिता घरात लोखंडी खाटेवर विसावली होती. तिच्या तिघी लेकीही तिच्याजवळच होत्या. दमल्याने दादूरामही घरात बसला होता. वादळी पाऊस होईल, असे एकही चिन्ह नव्हते. चक्रीवादळ काळ बनून आले मात्र सात वाजेच्या सुमारास अचानक वातावरणाचा नूर बदलला आणि सोसाट्याचे वारे वाहू लागले. हा हा म्हणता ढग जमून पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात वादळी वारे घोंगावू लागले. वादळाचे रूपांतर चक्रीवादळात झाले. त्यात परिसरातील अनेक झाडे कोसळली, मोठमोठ्या फांद्या मोडून पडल्या. त्यापैकी एक असलेले प्रभाकर गुजर यांच्या शेतातील चिंचेचे जीर्ण झाड कडाडऽऽ..असा आवाज करून दादूराम पावराच्या घरावर कोसळले. वादळामुळे ते जोराने खाली घरावर कोसळले. त्याखाली दबून अनिता व तिच्या तिन्ही लेकींचा जागीच मृत्यू ओढवला. खाटेशेजारी बसलेला दादूरामही झाडाखाली दाबला गेला होता. जोरदार पावसातही तो सुटकेसाठी मोठ्याने आवाज देत होता. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याचवेळी शेतमालक गुजर यांचा भाऊ प्रल्हाद तेथे आला. दादूरामचा आवाज ऐकून त्याच्या मदतीला धावला. त्याची कशीबशी झाडाखालून सुटका करून घेत ग्रामस्थांना बोलविले. मात्र तत्पूर्वीच अनिता व तिच्या मुलींचा मृत्यू झाला होता. अखेर झाडाखालून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. परिसरातील बहुतांश शेतांवर पावरांचे वास्तव्य स्थानिक सालदार मिळेनासे किंवा परवडेनासे झाल्याने शेतकरी पावरा लोकांना प्राधान्य देऊ लागले आहेत. वरखेडी परिसरात शेतांमध्ये अशी अनेक पावरा कुटुंबे वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. ते कुटुंबासह शेतातच राहत असल्याने सर्व कामे वेळेवर व विनासायास होतात, असा शेतकºयांचा अनुभव आहे. या घटनेमुळे उर्वरित कुटुंबांना अतीव दु:ख झाले आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेPolice Stationपोलीस ठाणे