गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:46 IST2020-01-02T11:46:05+5:302020-01-02T11:46:24+5:30

रामपुरा येथील घटना : अकस्मात मृत्यूची नोंद

Lovers commit suicide by strangulation | गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या

गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या


आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील वरझडी गावाजवळील रामपूरा येथे राहणाऱ्या एका प्रेमयुगलाने जवळील वाडी गावाच्या शिवारात सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आत्महत्या केल्याची घटना घडली़
३१ रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली़ विवाहित निलेश शांतीलाल पावरा (२५) याचे घराजवळील १९ वर्षीय शर्मिला सुरसिंग पावरा हिच्या सोबत प्रेमसंबंध होते़ निलेश विवाहित असल्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाला घरातून विरोध होत होता़ त्यामुळे त्याने शर्मिला हिला घेवून दुपारच्या सुमारास गावातून पळ काढला़ त्या दोघांनी गावापासून ४-५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी गावाच्या शिवारात असलेल्या मगन ईशा पावरा यांच्या शेतातील बांधावर असलेल्या एका पळसाच्या झाडाला दोर बांधून दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली़
घटनेचे वृत्त संध्याकाळी समजल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली़ पोलिसांना कळविल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्या दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले़ रात्री उशिरा शिरपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
१ जानेवारी रोजी दोघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले़

Web Title: Lovers commit suicide by strangulation

टॅग्स :Dhuleधुळे