कापडणे शिवारात गव्हाचे पीक तोट्यात, शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 22:09 IST2021-02-21T22:08:51+5:302021-02-21T22:09:14+5:30
एक बिघा शेतातून आले गव्हाचे केवळ ‘शंभर’ रुपयांचे उत्पन्न

कापडणे शिवारात गव्हाचे पीक तोट्यात, शेतकरी संकटात
कापडणे - गव्हाचे पीक तोट्यात आले आहे़ आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी स्थिती निर्माण झाली आहे़ परिणामी शेतकरी हतबल झालेले आहेत़ धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात हा प्रकार समोर आलेला आहे़ एक बिघा शेतातून गव्हाचे केवळ शंभर रुपयाचे उत्पन्न आले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ ९ हजार रुपयांच्या उत्पन्नांपैकी ८ हजार ९०० रुपयांचा खर्च येत आहे़ साहजिकच १०० रुपये शिल्लक राहत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे़
धुळे तालुक्यातील कापडणे गावासह संपूर्ण परिसरात रब्बी हंगामातील प्रमुख पीक समजले जाणारे गहू पिकाची सध्या काढणी सुरू झालेली आहे़ एकरी गव्हाचे पीक १२ ते १५ क्विंटल येणे आवश्यक असते़ मात्र यंदाच्या खरीप हंगामात गव्हासाठी महत्त्वपूर्ण समजले जाणारे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात थंडीचे अतिशय अल्प प्रमाण होते म्हणून गहू पिकाचे उत्पादनात निम्मी पेक्षाही जास्त मोठी घट आलेली आहे त्यात अजून चिंतेची अधिक भर म्हणून ७ जानेवारी रोजी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील विविध शेती शिवारातील गहू पिके आडवे पडून जमीनदोस्त झालेले होते आडवे पडलेल्या गव्हाच्या लोंब्यातील दाणे परिपक्व न झाल्याने यामुळे देखील उत्पादनात मोठी घट आलेली आहे त्यात पुन्हा शेतकºयांचे गहू काढणीवर येत असल्याने दिनांक १८ फेब्रुवारी रोजी देखील रिमझिम अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकरी घाईगडबडीत हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढण्याचा प्रयत्न करीत आहेत यामुळे गहू अस्वच्छ घाण निघत असल्याने आधीच उत्पादनात घट व त्यात गव्हाची गुणवत्ता घसरल्याने खाजगी व्यापारी गव्हाला केवळ बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा प्रचंड कमी किमतीत गव्हाची खरेदी केली जात आहे. गहू पिकाला वाढीव आधारभूत किंमत जाहीर करून सरकारने गहू खरेदी करावा अशी शेतकºयांची मागणी होत आहे. थंडीचे प्रमाण कमी व अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट आल्याने एक बीघा शेतात केवळ सहा क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळत आहे प्रतिक्विंटल खाजगी व्यापारी बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटलच्या भावाने गहू खरेदी होत आहे यामुळे शेतकºयाला नऊ हजार रुपयाचे एका बिघात उत्पादन येत असले तरी मात्र खर्चही तेवढाच आहे. 900 रुपये शेती मशागत रोटावेटर मारणे 600 रुपये गहू पेरणी खर्च, 2000 रुपये बियाणे,1600 रुपये खते, 500 रुपये तन नाशक फवारणी, 1500 रुपये गव्हाला पाणी भरणे मजुरी, 1800 रुपये गहू काढणी हार्वेस्टर मशीन मजुरी एकूण आठ 8900 रुपये खर्च येत असल्याने 9000 आलेले उत्पादनातून खर्च वजा 8900 केल्यावर शिल्लक केवळ शंभर रुपये शेतकºयाच्या हाती मिळतात़ सर्वत्र हास्यास्पद गोष्ट असून चार महिने गव्हाला रात्रंदिवस पाणी भरून मोठे काबाडकष्ट करून एक बिघा शेतातून गहू पिकाचे उत्पादन केवळ शेतकºयाला शंभर रुपये हातात मिळत आहेत.