मध्यप्रदेशातून टोळधाड येण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:54 IST2020-05-26T11:54:15+5:302020-05-26T11:54:37+5:30

कृषी विभाग अलर्ट: शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू,शेतात पहारा ठेवण्याची दिली सूचना

Locusts are expected to come from Madhya Pradesh | मध्यप्रदेशातून टोळधाड येण्याचा अंदाज

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मृग नक्षत्रात पेरण्या होतील या अपेक्षेने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत़ अमावस्येपासून कृत्तिका नक्षत्र सुरू झाले असून उन्हाचा पाराही प्रचंड प्रमाणात वाढला आहे़ तशातच बागायतदार शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरूवात केली आहे़ दरम्यान, मध्यप्रदेशमधून आपल्या जिल्ह्यामध्ये टोळधाड येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सुतोवाच येथील तालुका कृषी विभागाने सूचित केले आहे़
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे सर्व घटकांवरच याचा परिणाम झाला़ यामध्ये बळीराजाही संकटात आला़ आठवडी बाजार बंद झाले़ बाजार समित्यातील चक्रही कमी झाले़ त्यातच शेतात पिकणाºया मालाला बाजारपेठ हवी होती़ अशावेळी अनेक शेतकºयांनी आपल्या शेतमालासाठी संधी साधली़ त्यासाठी गावोगावी जावून भाज्यांची विक्री सुरू केली, त्यामुळे चांगले पैसे मिळाले़ तर काही शेतकºयांना तोटाही झाला़ असे असले तरी तालुक्यातील बळीराजा सध्या खरीप हंगामाची तयारी करीत आहे़
गेल्या वर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र १ लाख १२ हजार ८९७ हेक्टर होते़ खरीपात १०० टक्के पेरणी होते़ यंदाही तेवढेच क्षेत्र असणार आहे़ लक्षांकाक्षेत्रापैकी निम्मेच्यावर कापसाचे क्षेत्र या तालुक्यात सर्वाधिक असते़ इतर पिकांचेही क्षेत्र असते़ या हंगामासाठी कृषी विभागाने तीन वर्षातील बियाणे विक्री, सध्याच्या हंगामातील संभाव्य पेरणी व बियाणे बदलाचे प्रमाण याचा विचार केला आहे़ खरीप हंगामासाठी खताचेही नियोजन केले आहे़
तालुक्यात काही बागायतदार शेतकºयांनी कापूस लागवड करायला सुरूवात केली आहे़ मात्र कृषी विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कापसाची लागवड २५ मे नंतर करण्यास सूचित केले आहे़ त्यानुसार या आठवड्यात सर्वत्र कापूस लागवडीला सुरूवात होईल़
दरम्यान, मध्यप्रदेशमधून आपल्या जिल्ह्यामध्ये टोळधाड येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे शेतकºयांनी सावधान रहावे असे तालुका कृषी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे़ शेतकºयांनी खबरदारी व उपाययोजना करण्यासाठी शेतकºयांचे गट तयार करून रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी़ संध्याकाळी टोळ किटक लाखोच्या संख्येने शेतात उतरू शकतात़ टोळ किटक आल्यास डबे, पत्रे, ढाल, सायरन व ट्रॅक्टरने आवाज करा़ लॅम्डा सायक्लोहेथ्रीन ४०० मिली औषध ६०० लिटर पाण्यात मिसळून किंवा डायफ्लूबेन्झुरॉन १२० मिली औषध ६०० लिटर पाण्यात मिसळून सकाळी ७ वाजेपर्यंत फवारणी करावी़ टोळधाड आढळल्यास तातडीने तालुका कृषी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
मे महिन्यात मशागतीच्या कामांना वेग येतो़ परंतु यंदा कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे शेतकरी जवळपास दोन महिने घरीच बसून होते़ परंतु आता शेतीच्या कामाला संचारबंदीत सूट देण्यात आली आहे़ परिणामी पेरणीपूर्व मशागतीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ मशागतीच्या कामांना वेग आला होता़ परंतु वैशाख अमावस्येपासून कृत्तिका नक्षत्र सुरू झाले आहे़
अनेक शेतकरी कृत्तिका नक्षत्र पाळतात़ त्यामुळे मशागतीची कामे थांबविण्यात आली असून बैलांच्या खांद्यावरील जोखड बाजूला करण्यात आले आहे़
४यंदा मृग नक्षत्रात पेरण्या होतील असा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे़ मृग नक्षत्राचे वाहन म्हैस आहे़ म्हशींना पाण्यात डुंबण्याची सवय असते़ त्यामुळे मृग नक्षत्रात दमदार पावसाचा अंदाज असून पेरण्या वेळेवर होतील असे पुरोहित जयेश जोशी यांनी सांगितले़

Web Title: Locusts are expected to come from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे