लॉकडाऊनमध्ये नागरिकांकडून गरजूंना मदतीचा ओघ सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:58 IST2020-04-07T12:58:03+5:302020-04-07T12:58:28+5:30
पिंपळनेर : दररोज २५० व्यक्तीना मोफत जेवणाची सोय

dhule
पिंपळनेर : लॉकडाऊन काळात आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे, यासाठी समाजसेवी व्यक्ती, सामाजिक संघटना आता आपल्या परीने हवी ती मदत गरजूंना करू लागले आहे. येथील भोजन सेवा मंडळ पिंपळनेर यांच्या माध्यमातून दररोज २५० व्यक्तींना दुपारी व रात्रीचे भोजन घरपोच दिले जात आहे. अशी व्यक्ती आपल्या जवळपास असल्यास त्यांची नावे आमच्यापर्यंत पोहोच करावी असे आवाहन देखील ही समिती करीत आहे. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत ही भोजन सेवा देणार असल्याचे मत मंडळाचे कैलास गोगड यांनी कळविले आहे.
अपर तहसील विनायक थविल हे देखील प्रशासनाच्या आदेशावरून गरजू व्यक्तींना मदत करीत संसारोपयोगी किराणा माल साहित्य पोहच करीत आहेत. राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम मार्शल स्कूल चेअरमन संभाजीराव अहिरराव हे शिव भोजनात सध्या फक्त सत्तर ताटांची मान्यता आहे या लोकांना जेवण देऊन, दररोज गोरगरीब गरजू अशा ६० ते ७० नागरिकांना जेवण्याची व्यवस्था स्वत:च्या खचार्ने करीत आहेत.दहीवेल येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते पंकज खैरनार व सुधीर भानुदास गांगुर्डे यांनी दहीवेल येथे रस्त्याच्या बाजूला राहणारे गरजू कुुटुंबियांना एक किलो तांदुळ, अर्धा किलो दाळ, एक किलो साखर, एक किलो चहा पावडर, एक किलो तेल अशा जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. पश्चिम पट्टयात माजी खासदार बापू चौरे, काँग्रेस साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनीही तेल, साखर, तांदूळ, चहापुडा यासह डाळी चे वाटप केले. घाबरू नका पण स्वत:ची काळजी घ्या असा सल्ला देखील चौरे यांनी दिला. चिपलीपाडा ता साक्री येथे ग्रामपंचायत चिपलीपाडा व इंजि.मोहन सूर्यवंशी भाजपा मंडळ अध्यक्ष पिंपळनेर यांच्या विद्यमाने आज २५०० मास्क चे वाटप भाजपचे मोहन सूर्यवंशी सरपंच रतन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य तापीराम सूर्यवंशी, ग्रामसेवक खैरनार भाऊसाहेब अंगणवाडी सेविका शोभा सूर्यवंशी, अंजना अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.