धुळे : महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे १६४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर धुळे महानगरपालिका हद्दीत ३१ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत शासनाच्या ३१ मे चे आदेश प्रमाणे २ ते ४ जून या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.
लॉकडाऊनमध्ये आणखी ४ जूनपर्यत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 20:47 IST