धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:35 AM2019-08-22T11:35:30+5:302019-08-22T11:35:53+5:30

५८ हजार ७११ यांना मिळाला प्रत्यक्ष लाभ, १७ हजार अद्याप वंचित

Loan waiver benefits to 3 thousand 5 farmers in Dhule district | धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ७६ हजार ४१८ शेतकऱ्यांना ४१७ कोटी ३८ लाख ४१ हजार ७०६ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यातील ५८ हजार ७११ शेतकºयांना २४२ कोटी ६१ लाख ४९ हजार ४२८ रुपयांची प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरीत १७ हजार ७०७ शेतकरी अद्याप वंचित असून त्यांना १७४ कोटी ७६ लाख ९२ हजार २७८ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. जिल्हा बॅँकेसह राष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बॅँक मिळून हा लाभ देण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या १८ याद्या (ग्रीन लिस्ट) धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला प्राप्त झाल्या आहेत. या बॅँकेच्या सभासद असलेल्या ३२ हजार १८५ शेतकºयांना तर राष्टÑीयकृत बॅँकांच्या ४३ हजार ६०८ शेतकरी सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच खाजगी बॅँकांच्या अवघ्या ५१३ व ग्रामीण बॅँकेच्या ११२ लाभार्थ्यांचाही समावेश आहे.
जिल्ह्यातील ७६ हजार ४१८ लाभार्थ्यांपैकी ५८ हजार ७११ शेतकºयांना आतापर्यंत प्र्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. त्यात दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत ३४ हजार ९७८ शेतकºयांचे १९० कोटी २६ लाख २१ हजार १६३ रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. एकरकमी परतफेड योजने (ओटीएस) अंतर्गत ३ हजार ६०६ शेतकºयांना १६ कोटी ६९ लाख ५७ हजार ४९६ रुपयांचा लाभ मिळाला. तर ज्या शेतकºयांनी नियमित कर्ज फेड केली आहे, अशा २० हजार १२७ शेतकºयांना प्रोत्साहन स्वरुपात एकूण ३५ कोटी ६५ लाख ७० हजार ७६७ रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
ओटीएस योजनेतील लाभार्थी शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा
दरम्यान या योजनेंतर्गत ज्या लाभार्थी शेतकºयांना अद्याप लाभ मिळालेला किंवा देण्यात आलेला नाही, त्यात दीड लाख मर्यादेपर्यंतच्या ९०२ शेतकºयांचा समावेश असून त्यांना २ कोटी ६६ लाख ८१ हजार ५४४ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ओटीएस योजनेंतर्गत समाविष्ट तब्बल १६ हजार १२२ शेतकरी अद्याप संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून त्यांनी दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीसाठी त्यापेक्षा जास्त असलेल्या उर्वरीत एकूण १ कोटी ७० लाख ६४ हजार ७११ रुपये एवढ्या रकमेचा भरणा झालेला नाही. त्या साठीची मुदत आॅक्टोबरअखेरपर्यंत वाढविल्याचे सांगण्यात आले. तर नियमित कर्जफेड करणाºया ६८३ शेतकºयांना अद्याप त्यांना मिळणारी १ कोटी ४५ लाख ३९ जार ५९० अद्याप त्यांच्या बॅँकखात्यात जमा झालेली नाही.
दरम्यान सर्वच शेतकºयांना वेळेत कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास त्यांना खरीप, रब्बी पिकांचे नियोजन करणे सोयीस्कर होऊ शकेल. यासाठी संबंधित विभागाने व शेतकºयांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.

Web Title: Loan waiver benefits to 3 thousand 5 farmers in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे