शपथपत्र न भरल्याने शेतकºयांपुढे अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 11:14 IST2017-08-04T11:12:24+5:302017-08-04T11:14:25+5:30
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना : १७ शेतकºयांनाच आतापर्यंत लाभ

शपथपत्र न भरल्याने शेतकºयांपुढे अडचणी
आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाने शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी जाहीर करून कर्जदार शेतकºयांनी शपथपत्र भरल्यानंतर त्यांना तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याबाबत अध्यादेश दिला होता. मात्र, जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी आतापर्यंत शपथपत्रच भरून बॅँकांकडे दिलेले नाही. परिणामी, त्यांना दहा हजार रुपयांची उचल देण्यास बॅँकांना अडचणी येत असल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १७ शेतकºयांनीच शपथपत्र भरून दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे.
शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. त्यानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याचे आदेश बॅँकांना दिले. परंतु, बॅँकस्तरावर दहा हजार रुपये दिले जात नसल्याचे सांगून भाजपाच्या पदाधिकाºयांनी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेसमोर बुधवारी व गुरुवार आंदोलन केले. प्रश्न त्वरित न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा पदाधिकाºयांनी दिला होता.