पाच दिवसांच्या आत पिक कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 09:38 PM2020-08-06T21:38:01+5:302020-08-06T21:38:19+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण करा

Loan the crop within five days | पाच दिवसांच्या आत पिक कर्ज द्या

dhule

Next

धुळे : जिल्ह्यातून पीक कजार्साठी पात्र शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांकडे अर्ज सादर करावेत. त्यांनी शेतकºयांचे अर्ज बँकेच्या शाखेत सादर करावेत़ त्यानंतर संबंधित बँकेने पीक कर्ज मंजुरीची प्रक्रिया पाच दिवसांत पूर्ण करून निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली़
राज्यस्तरीय बँकर्स समिती मार्फत खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपासाठी धुळे जिल्ह्यातील १९ बँकांना ८३७ कोटी ६६ लाख रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत धुळे जिल्ह्यातील बँकांनी ३२ हजार ७९ शेतकºयांना २६२ कोटी ६१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करून ३१.४० टक्के लक्षांक साध्य केला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या एकूण शेतकºयांपैकी १३ हजार ३११ शेतकºयांना ८५ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.
धुळे जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकाना ५९१ कोटी ७५ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ जुलै अखेर १३६ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यातील ११ खासगी बँकाना ९१ कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलै अखेर १८ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस ४ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३१ जुलै अखेर दोन कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १५० कोटी १७ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १०४ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
खरीप पीक कर्ज वितरणाचा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी आढावा घेतला आहे. मागील आठवड्यात कृषी मंत्री दादा भुसे यांनीही पीक कर्ज वितरणाचा आढावा घेवून व्यापक अभियान राबवावे, अशा सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलेले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी एकूण ४५ हजार ८२९ शेतकºयांची यादी उपलब्ध झालेली आहे. त्यापैकी ४३ हजार ५४० शेतकºयांनी आधार प्रमाणीकरण केले आहे़ २ हजार २८९ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. संबंधित शेतकºयांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर किंवा बँक शाखेत संपर्क करून १५ आॅगस्ट पूर्वी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

Web Title: Loan the crop within five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे