स्टेअरिंग लॉक झाल्याने भरधाव ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:22 IST2020-10-23T15:21:57+5:302020-10-23T15:22:27+5:30
चालक जखमी : जवाहर मेडीकल कॉलेजजवळील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने भरधाव ट्रक उलटला
धुळे : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक जवाहर मेडीकल कॉलेजजवळ भरधाव ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ट्रक उलटल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली़ या अपघातात चालक हा जखमी झाला आहे़
एमएच ०२ - ७०८६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये खासगी ट्रान्सफोर्ट कंपनीचा माल भरुन अहमदाबादकडून औरंगाबादकडे जात असताना ट्रक धुळ्यानजिक जवाहर मेडीकल कॉलेजजवळ आल्यानंतर अचानक स्टेअरिंग लॉक झाले़ परिणामी ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले़ घटनेचे गांभिर्य ओळखून चालकाने ट्रकमधून खाली उडी मारल्याने तो केवळ जखमी झाला़ सुदैवाने त्याचा जीव वाचला़ काही अंतरावर जावून रस्त्याच्या बाजुला गवतामध्ये हा ट्रक उलटला़