धुळ्यातून पशुधन चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:22+5:302021-06-10T04:24:22+5:30
चारचाकी वाहनाची चोरी धुळे : तालुक्यातील गरताड येथे अंगणात उभे केलेले एमएच ०४ डीडी ०१४७ हे ९० हजार रुपये ...

धुळ्यातून पशुधन चोरीला
चारचाकी वाहनाची चोरी
धुळे : तालुक्यातील गरताड येथे अंगणात उभे केलेले एमएच ०४ डीडी ०१४७ हे ९० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन मंगळवारी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कैलास शामराव पाटील (४५, रा. गरताड) यांनी मोहाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल जाधव याबाबत तपास करीत आहेत.
सर्पदंशामुळे वृद्धाचा मृत्यू
धुळे : तालुक्यातील फागणे येथील साहेबराव गटलू पाटील (६०) हे मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास शेतातील गुरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना सर्पाने दंश केला. त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. मोरे तपास करीत आहेत.