रंगभूमीवरच्या कलाकाराची भाजीपाला विकून गुजराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:52 IST2020-11-09T22:52:09+5:302020-11-09T22:52:09+5:30
काेराेनाचा परिणाम ; अनेक कलावंत आले रस्त्यावर

रंगभूमीवरच्या कलाकाराची भाजीपाला विकून गुजराण
href='https://www.lokmat.com/topics/dhule/'>धुळे : काेरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गर्दी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणार्या कलावंताचा ८ महिन्यापासून रोजगार बुडाल्याने कलावंताना भाजी विकुण व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सद्या यात्रा, उरूस, जयंती, महोत्सव, लग्न, वाढदिवस,संमारंभ, साेहळे आदी सांस्कृतिक कार्यक्रमांना शासनाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ५ ते ६ महिन्यापासून एकही कार्यक्रम यंदा झालेले नाहीत. त्यामुळे लोककलांवताच्या संसाराची धुळधाण झाली आहे. अनेकांनी सोडली लोककलाधुळे, शिरपूर, शिंदखेडा तसेच साक्री अशा चारही तालुक्यात चारशे नामवंत कलावंत आहे. अनेकांनी आहिराणी व मराठी चित्रपटापासून गावपातळीच्या तमाशापर्यत काम केले आहेत. प्रत्येक कलावंताची कला ही एक आत्मा आहे. मात्र कोरोना महामारीने कलावंताचा आत्मा हिरावून घेतला आहे. जिल्हात कलांवताच्या विविध संघटना आहेत. त्यामुळे कलावंताची विभागणी झाली आहे. त्यामुळे कलावंत उपासमारीला सामाेरे जात असतांनाही शासनाकडे मदत मागता येवू शकली नाही किंवा आवाज पोहचू शकला नाही. आगामी काळात कलावंतांनी एकत्र यावे, तरच कलावंताचे प्रश्न सुटू शकतात. तमाशा कलावंताना उमासमारीदरवर्षी ग्रामदेवतेची यात्रेचे आयोजन केले जाते. त्यातून शेकडो तमाशा कलांवतांना कलासादरी करणातून राेजगार मिळतो, यंदा यंदा कोरोना संकटामुळे तमाशी बुकींग झाले नाहीत. मंगळवारी जेलरोडवर कलावत आता दिसून येत नाही. तमाशा फड चालविण्यासाठी मालकांना लाखो रूपये उसणमारीने घेऊन कलावंतासाठी पैसा उभा करावा लागतो. मात्र लॉकडाऊननंतर शासनाने गर्दी करण्यास मनाई घातल्याने गावोगावी होणारे तमाशे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मालक किती दिवस कलावंत सांभाळणार म्हणून अनेकांनी शेती, मजूरी तर महिलांना रोजदांरी करावी लागत आहे.