शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची प्रारुप यादी जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 5:45 PM

भाजपची हरकत : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची पूर्वतयारी

ठळक मुद्देनिवडणुका पुढे ढकलली तरी पूर्वतयारी सुरू मतदान केंद्रांची प्रारूप यादी प्रसिद्धसाक्री केंद्राबाबत भाजपची हरकत, स्थळ बदलाची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र २५ मेनंतर निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरूच आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदानकेंद्रांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली असून त्यावर २० मेपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. आजअखेर भाजपने साक्री येथील मतदान केंद्राबाबत हरकत घेतली आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच जिल्ह्यात १२ मतदानकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात साक्री तालुक्यात दोन, शिंदखेडा दोन, शिरपूर तीन व धुळे तालुक्यात पाच अशी एकूण १२ मतदानकेंद्रांची प्रारूप यादी  निवडणूक उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. तत्पूर्वी विविध राजकीय पक्ष, शिक्षक संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यात त्यांना प्रस्तावित केंद्रांची  सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच प्रारुप यादीसंदर्भात तुमच्या सूचना, हरकत, अभिप्राय असल्यास ते देण्याचे आवाहन केले. या बैठकीला प्र.जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), कम्युनिस्ट पार्टीचे प्रवीण शिंदे, बसपाचे अनिल दामोदर, टीडीएफचे उमेदवार संदीप बेडसे यांच प्रतिनिधी केतन भदाणे, शिक्षक संघटनेचे संजय पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. भाजपतर्फे हरकत दाखल साक्री तालुक्यातील साक्री येथे न्यू इंग्लिश स्कूल येथे असलेल्या मतदान केंद्रास भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबन चौधरी यांनी हरकत घेतली आहे. तसेच तेथील सी.गो. पाटील महाविद्यालयात हे मतदान केंद्र ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुटी संपल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे सोमवारी रूजू होत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत या संदर्भात निर्णय घेऊन तो मुख्य निवडणूक अधिकाºयांना कळविला जाईल. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर निर्णय अंतिम होईल. शिक्षक मतदार संख्येत ५०० ने वाढ  २०१२ मध्ये झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी ७ हजार ४२६ मतदार होते. यावेळी ही संख्या सुमारे ५०० ने वाढली असून ७ हजार ९१९ एवढी झाली आहे. निरंतर प्रक्रियेंतर्गत अद्याप मतदार नोंदणी सुरू असून त्या अंतर्गत १४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची डाटा एन्ट्री झाली असून या मतदारांची भर पडून मतदारसंख्या ८ हजारावर पोहचणार आहे. माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक हे शिक्षक मतदारसंघाचे मतदार असतात. 

 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorतहसीलदार