चिमठाणे पिंप्री येथील दारुची भट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:04 IST2020-04-08T13:04:24+5:302020-04-08T13:04:57+5:30
शिंदखेडा तालुका : महिलांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी केली कारवाई

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : चिमठाणे पिंप्री येथे अवैध गावठी दारूच्या भट्टया महिलांनी दाखविल्या नंतर चिमठाणे येथील पोलिस दुरक्षेत्राच्या सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे यांच्यासह कर्मचारी यांनी मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुमारे ३०० लिटर दारू व साहित्य नष्ट केले आहे.
मंगळवारी दुपारी पिंप्री गावशिवरातील बुराई नदी काठावर अवैध गावठी दारू पाडली जात आसल्याच्या तक्रारी महिलांनी येथील पोलिस दुरक्षेञाचे सहाय्यक निरिक्षक मनोज ठाकरे यांच्या कडे केल्या नंतर आज सहाय्यक निरिक्षक ठाकरे , हवालदार प्रभाकर सोनवणे, हवालदार दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते योगेश गिरासे यांच्यासह महिलांनी चार दारू अड्डयावर दारू पाडण्यासाठी साहित्य, ३०० लिटर दारू नष्ट करण्यात आली आहे. कोणावर ही अवैध दारूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.