ब्राह्मणदरा नाल्यात दारुचा अड्डा उध्द्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 21:29 IST2020-05-07T21:29:14+5:302020-05-07T21:29:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जैताणे : साक्री तालुक्यातील जैताणे शिवारात असलेल्या ब्राह्मणदरा नाल्यात निजामपूर पोलिसांच्या पथकाने धाड टाकत ६१ हजार ...

ब्राह्मणदरा नाल्यात दारुचा अड्डा उध्द्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जैताणे : साक्री तालुक्यातील जैताणे शिवारात असलेल्या ब्राह्मणदरा नाल्यात निजामपूर पोलिसांच्या पथकाने धाड टाकत ६१ हजार १०० रुपये किंमतीचा बेवारस गावठी दारुचा अड्डा उध्दवस्त केला़ ही कारवाई बुधवारी करण्यात आली़
साक्री तालुक्यातील निजामपूर, जैताणे शिवारालगत मोठ्या प्रमाणावर गावठी दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ तसेच ब्राह्मणदरा नाल्यात काटेरी झुडूपाला लागूनच गावठी दारु तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार, निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हेड कॉन्स्टेबल जे़ एस़ शिंदे, पोलीस कर्मचारी चौधरी, पिंजारी, होंडे यांनी बुधवारी जैताणे शिवारातील ब्राह्मणदरा नाल्यात सकाळी ७ वाजेच्या सुमारास धाड टाकली़
त्यावेळेस याठिकाणी गावठी दारुसह ती तयार करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री आढळून आली़ यावेळी मात्र कोणीही संशयित आढळून आला नाही़