लिंबाच्या झाडावर वीज कोसळली, जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:03 PM2019-04-16T12:03:38+5:302019-04-16T12:04:14+5:30

तिसगाव-ढंढाणे : वातावरणात झाला बदल

Lightning collapsed on lemon tree, survivor survived | लिंबाच्या झाडावर वीज कोसळली, जीवितहानी टळली

लिंबाच्या झाडावर वीज कोसळली, जीवितहानी टळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अमुलाग्र बदल झालेला आहे़ धुळे तालुक्यातील तिसगाव-ढंढाणे परिसरात सोमवारी रात्री वादळ-वारा आणि विजेचा कडकडाट झाला़ तिसगाव गावातील शेतकरी जगन पाटील यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर अचानक विज कोसळली़ त्यामुळे झाड क्षणार्धात कोरडेठाक पडले आहे़ झाडाचा काही भाग जळून खाकही झाला आहे़ यात मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़ वादळ-वाºयाच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे़ काही ठिकाणी वित्तहानी होत असून काही ठिकाणी जनावरांनाही फटका बसला आहे़ 

Web Title: Lightning collapsed on lemon tree, survivor survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे