धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ८ वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:38 IST2018-04-30T16:38:18+5:302018-04-30T16:38:18+5:30

राज्य परिवहन महामंडळाची योजना, १ मे रोजी होणार कार्डचे वाटप

Lifelong free travel concession to 8 Virapati's in Dhule-Nandurbar district | धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ८ वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ८ वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास१ मे पासून सवलत लागू पालकमंत्र्यांच्याहस्ते सवलत कार्डचे वाटप

आॅनलाइन लोकमत
धुळे :  महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ८ वीर पत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत कार्डचे वाटप १ मे रोजी करण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत भारतीय सैन्यदलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वप्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत १ मे २०१८ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.
त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ६ तर नंदुरबार जिल्हयातील २ अशा एकूण ८ वीर पत्नींना १ मे रोजी महाराष्टÑ दिनाचे औचित्य साधून मोफत प्रवास सवलत कार्डचे वाटप करण्यात येईल. ध्वजारोहणानंतर धुळ्यात सकाळी ८ वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते पोलीस कवायत मैदान  येथे तर नंदुरबारला पालकंमत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते पोलीस कवायत मैदान, येथे सवलत कार्ड वाटप करण्यात येणार आहे.

 

Web Title: Lifelong free travel concession to 8 Virapati's in Dhule-Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे