शिवसेनेने ठोकले तहसील कार्यालयाला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:32 IST2018-10-09T16:30:44+5:302018-10-09T16:32:18+5:30
शिंदखेड्यात दुष्काळ जाहीर करा : तहसिलदारांना निवेदन सादर

शिवसेनेने ठोकले तहसील कार्यालयाला कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी करत शिवसेनेने तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले़ तहसीलदार येत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला़ काही वेळेनंतर तहसीलदार आले आणि त्यांनी निवेदन स्विकारल्यानंतर कुलूप उघडण्यात आले़
शिंदखेडा तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेनेने मंगळवारी दुपारी तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकले़ तहसीलदार येऊन निवेदन घेत नाही तो पर्यंत गेट उघडणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. तसेच गेटवर बसून शेतकºयांना वेठीस धरणाºया भाजप सरकारचा धिक्कार, तहसीलदारांचा धिक्काराच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तहसीलदार सुदाम महाजन यांनी आंदोलन करणाºया शिवसैनिकांची भेट घेऊन चर्चा केली़ निवेदन स्विकारले़ त्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले़ तहसील कार्यालयाचे गेट उघडले.
यावेळी जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, जिल्हा संघटक मंगेश पवार, विधानसभा संघटक छोटू पाटील, तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, भाईदास पाटील, सर्जेराव पाटील, शानाभाऊ धनगर, डॉ़ मनोज पाटील, गिरीश देसले, मयुर निकम, नंदकिशोर पाटील, सागर देसले, संतोष देसले आदी उपस्थित होते़