खारघर महाविद्यालयात ग्रंथालय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST2021-08-13T04:41:11+5:302021-08-13T04:41:11+5:30
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जे. गावित यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...

खारघर महाविद्यालयात ग्रंथालय दिवस साजरा
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जे. गावित यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्र. प्राचार्य डॉ. गावित उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा सर्वप्रथम विचार डॉ. रंगनाथन यांनी मांडला होता. सध्याच्या डिजिटल युगात जिथे ज्ञान प्राप्त करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहे तिथे वाचक ग्रंथालयभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज असून ग्रंथालयाचे संवर्धन होणे आवश्यक आहे असेही डॉ. गावित म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजक श्री माळी यांनी ग्रंथपालन शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालयाच्या विकासात योगदान व त्यांच्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही. डी. झुंजारराव यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.डी. रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. एस. एम. बोरसे, शा. शि. संचालक डॉ. टी.आर.शर्मा,अन्य प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.