शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

भगिनी सन्मान योजनेकडे महिला बचत गटांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 11:31 IST

विभागातील १३पैकी फक्त ३ बसस्थानकांसाठी ९ अर्ज प्राप्त, अपेक्षित प्रचार झालाच नाही

ठळक मुद्दे८ ते २२ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत ही योजना राबविण्यात येत आहेधुळे विभागात तीन बसस्थानकासाठी फक्त ९ अर्ज प्राप्तअपेक्षित प्रचार, प्रसार न झाल्याने, अनेकांना योजनेची माहिती मिळाली नाही 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दिवाळीनिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू बसस्थानकावर विक्री करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ‘भगिनी सन्मान योजना’ सुरू केली. मात्र धुळे विभागात या योजनेला अपेक्षित प्रतिसादच मिळालेला नाही. विभागातील १३ पैकी फक्त  तीन बसस्थानकांसाठी अवघे ९ अर्ज प्राप्त झाल्याची  माहिती विभागीय कार्यालयातून मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळीनिमित्त प्रथमच ही योजना ८ ते २२ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत केवळ महिला स्वयंसहायता बचत गटांना तात्पुरत्या स्टॉलसाठी बसस्थानकावर  १०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नाममात्र एक रूपया फी आकारण्यात येणार आहे.  एका बसस्थानकावर पाच स्टॉल लावण्याची मुभा होती. स्टॉल लावण्यासाठी महिला स्वयंसहायता बचत गटांना ४ आॅक्टोबरपर्यंत विभागीय कार्यालयात अर्ज करावयाचे होते. परंतु धुळे विभागात ‘भगिनी सन्मान योजनेकडे’ महिला बचत गटांना पाठ फिरवल्याचे चित्र आहे.  विभागात धुळ्यासह साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, शिंदखेडा, नवापूर, दोंडाईचा, पिंपळनेर, तळोदा, चिमठाणा, धडगाव ही १३ प्रमुख बसस्थानके आहेत.मात्र या योजनेसाठी धुळ्यातून फक्त एक व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी यांच्याकडून  नंदुरबार व तळोद्यासाठी प्रत्येकी चार-चार अर्ज प्राप्त झालेले आहेत. उर्वरित १० बसस्थानकांवर स्टॉल लावण्यासाठी एकाही बचत गटाचा अर्ज प्राप्त झालेला नाही.  म्हणजे १३ पैकी फक्त तीनक बसस्थानकावर स्टॉल लावण्यासाठी अवघे ९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. स्टॉल लावण्यासाठी ज्या प्रमाणात प्रचार, प्रसार  होणे गरजेचे होते,  त्या प्रमाणात तो झालेला नाही.  परिणामी अनेक महिला बचत गटांपर्यंत ही योजनाच पोहचली नाही. योजनेची माहिती नसल्याने, बचत गटांनीही त्यासाठी अर्ज केला नसल्याचे चित्र आहे.बचत गटांना फराळ, वस्तू विकण्याची मुभाया योजनेंतर्गत महिला बचत गटांना दिवाळीसाठी तयार केलेले फराळाचे पदार्थ तसेच पणत्या, आकाश कंदिल, साबण, उटणे, लाडू, अनारसे, आदी वस्तू विक्री करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या स्टॉलच्या माध्यमातून व्यावसायिक संस्थांनी तयार केलेल्या पदार्थांची विक्री मात्र बचत गटांना करता येणार नसल्याचे पत्रकात म्हटलेले आहे.