प्राथमिक शिक्षणासोबतच स्वयंरोजगाराचे देता धडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:49 IST2020-02-19T13:47:57+5:302020-02-19T13:49:44+5:30
चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क मुलांनी केवळ शिक्षण घेऊन भविष्यात पुस्तकी किडा होऊ नये़ तसेच शिक्षणासोबतच त्यांना भविष्यात ...

dhule
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलांनी केवळ शिक्षण घेऊन भविष्यात पुस्तकी किडा होऊ नये़ तसेच शिक्षणासोबतच त्यांना भविष्यात बेरोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षण सोबतच व्यवसायिक केलेचे धडे शिकविण्याचा ध्यास घेतला आहे़ त्यामुळे भविष्यात त्यांना स्व:ताचा व्यवसाय उभा करता येवू शकतो, असे मत शिरपूर तालुक्यातील टेंभेपाडा जि़प़ शिक्षक अशोक सोनवणे यांनी ‘लोकमत ’शी बोलतांना सांगितले़
प्रश्न: आतापर्यत किती मुलांना हस्त कला शिकविल्यात?
उत्तर: जिल्हा परिषद टेंभेपाडा येथील आदिवासी शाळेत १५० मुलं शिक्षण घेत आहेत़ शाळेतील मुलांना प्राथमिक शिक्षणासोबतच हस्तकला व शिल्पकला असे नवनवीन प्रयोग करून घेतो़ त्यामुळे त्यांना बौध्दीक कलेची वाव व रोजगाराचे धडे शिकण्यास मिळतात़
प्रश्न: आतापर्यत कोण-कोणत्या हस्तकला तुम्ही साकरल्या आहेत?
उत्तर: देशातील ताजमहल, गेट वे आॅफ इंडिया, लाल किल्ला, इंडिया गेट, कुतूबमिनार, सांचीस्तूप अशा विख्यात इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या आहेत़ त्यासाठी थर्माकोल, माऊंटबोर्ड पेपर, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, शाडूमाती यासारख्या साहित्याचा वापर केला आहे. या सगळ्या वास्तू शाळेतल्या मुलांना त्यांच्या वैशिष्ठ्यांसह दाखवून त्यांना शिकविल्या जातात़
प्रश्न: तुमच्या कोणत्या हस्तकलेचा निवड झाली?
उत्तर: सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात मी साकारलेले घोडयाच्या शिल्पांची निवड झाली होती. अनेकांकडून या कलेचे कौतूकही झाले होते़ २०१७ मध्ये पुण्यातील समता शिक्षा विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली व राज्यातील कलाशिक्षणाच्या संकेत स्थळावर माझ्या हस्तकलेला प्रसिद्धी देण्यात आली होती़
कधी बेरोजगार होण्याची भिती वाटली नाही़
मला चित्र, शिल्पं, संगीताची बालपणापासून आवड आहे. आई- वडिलांनी ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मला बालवयात कला अवगत झाली़ कलेच्या जोरावर मी कधी भविष्यात बेरोजगार होईल अशी मनात कधीच भिती निर्माण झाली नाही़
अष्टपैलू शिक्षक म्हणून झाला गौरव
आपल्या ठाई असलेल्या कलेचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयोग करून घेणाऱ्या सोनवणे यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिरपूर येथील योगविद्याधाम सेवाभावी संस्थेकडून प्रसिद्धी परान्मुख कलाकार म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच २०१९ यावर्षी बहुउद्देशिय कुणबी पाटील महिला मंडळाकडून देखील अष्टपैलू शिक्षक म्हणून गौरव झाला आहे़