धुळे : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते विधानसभेत प्रभावीपणे मांडले जातील, असे आश्वासन विश्वास आमदार डॉ़ फारुख शाह (धुळे) यांनी शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केला़शहरातील जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अॅड़ कै़ नानासाहेब झुलाल भिलाजीराव पाटील नगरीत महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे ४८ वे राज्य अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले़ त्यावेळी आमदार डॉ़ शाह बोलत होते़ याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ़ अरुण साळुंखे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ सुभाष बोरसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, जयहिंद संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांच्यासह राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्या राज्य कार्यकारिणी संघटनेचे सतिष नाडगौडा (नाशिक), विलास अत्रे (अकोला), मिलींद जोशी (रायगड), मंगला भांडरवार (वर्धा), देवानंद ठाकूर (धुळे), राजेंद्र घुबे (बुलढाणा), गजानन काळे (यवतमाळ), रवींद्र कोकाटे (नागपूर), वसिम सय्यद (रायगड) यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते़आमदार डॉ़ शाह पुढे म्हणाले, शिक्षकेतर कर्मचाºयांचे खूप प्रश्न आहेत़ ते सोडविण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे़ आपल्या जे काही समस्या, अडचणी असतील ते माझ्यापर्यंत पोहचवा़ ते सोडविण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल़ तुमच्या समस्या विधानसभेपर्यंत पोहचवून त्या सोडविण्यासाठी माझा पाठपुरावा राहिल असा आत्मविश्वास डॉ़ शाह यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला़यावेळी डॉ़ अरुण साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले़ यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली़ सूत्रसंचालन सीमा डोंगरे यांनी केले. अधिवेशनला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अधिवेशनात १० ठराव केले पारितशिक्षकेतरांचा सुधारीत आकृतीबंध रद्द करुन शिक्षकेतरांच्या कामांचे फेर मुल्यांकन करण्यात यावे़शिक्षकेतरांना २४ वर्षानंतरची दुसरी कालबध्द पदोन्नती योजना लागू करावी़कर्मचाºयांना सहाव्या वेतना आयोगानुसारची वेतनातील अन्यायकारक वसुली थांबवून पुर्वलक्ष प्रभावाने वेतनबंध दुरुस्त करावा़कर्मचाºयांचा गणवेश व गणवेश धुलाईभत्ता विशेष वेतन देयकाने मंजूर व्हावा़सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गं्रथपालांना प्रशिक्षीत पदवीधरांची / वेतनबंध व वेतनश्रेणी मिळावे़अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेश ग्रंथपालात रुपांतर करावे़प्रयोगशाळा पटी परिचर संरक्षित करण्यात यावे़सातव्या वेतन आयोगातील त्रुटीची दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी़कनिष्ठ लिपीकाच्या पदास कार्यालयीन सहायक पदात रुपांतर करण्यात यावे़शैक्षणिक पात्रताधारकास त्यानुसार पद मंजूर करण्यात यावे़
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 21:49 IST