खारेखान पाडा येथे स्वतंत्र दिनानिमित्ताने कायदेविषयक जनजागृती शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:22+5:302021-08-17T04:41:22+5:30
यावेळी शेती व महिला बचत गटातील महिलांच्या उन्नतीसाठी वकील संघ ५० सीताफळ, ५० जाभूळ वन विभागाकडून ४०० ...

खारेखान पाडा येथे स्वतंत्र दिनानिमित्ताने कायदेविषयक जनजागृती शिबिर
यावेळी शेती व महिला बचत गटातील महिलांच्या उन्नतीसाठी वकील संघ ५० सीताफळ, ५० जाभूळ वन विभागाकडून ४०० आवळा ,२०० कडूनिंब झाडे बचत गटांना उपलब्ध करून देण्यात आली, तर स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरपूर कार्पोरेट सोशल फंडमधून राशी महिला ग्रामसंघाला औजार बॅंक साहित्य वाटप माध्यमातून साहित्य बॅटरी स्प्रे ५, सायकल कोळपे ४, ड्रम ३, बेड ५, कपाशी चिमटा ३, भाजीपाला कॅरेट १५, बायपास लुपर २, विडपेन ३, स्मॉल टिअर ३, बेडरेक ३, ग्रीप हॅण्डल २, पेरणी यंत्र २, ग्रासकटर १, अर्थड्रील १९ असे एकूण ९० हजार रुपये किमतीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाला शासकीय सर्व विभागाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, सर्व वकील बार असोशिएशनचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदींनी मेहनत घेऊन कार्यक्रमास यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरपूर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष संभाजी देशमुख यांनी केले तर रंजना पावरा यांनी आभार प्रदर्शन केले तसेच सूत्र संचालन ॲड. किशोर सोनावणे यांनी केले.