शिंदखेडा येथे शिवचरित्रावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:26 IST2020-02-23T13:26:16+5:302020-02-23T13:26:46+5:30
लिलाधर पाटील । शिवाजी महाराजांचे संस्कार, युद्धनीतीवर मार्गदर्शन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उज्वल रुरल डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेच्या शिंदखेडा येथील शैक्षणिक संकुलात शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अमळनेर येथील शिवचरित्र व्याख्यानकार लिलाधरराव शिवाजीराव पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.आर. पाटील उपस्थित होते. लिलाधर पाटील यांनी शिवाजी महाराजांचे संस्कार, शिक्षण व युद्धनीती यावर उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. त्यांनी सोळाव्या शतकातील परिस्थिती आणि आजची एकविसाव्या शतकातील परिस्थिती यांची सांगड घालत शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमासाठी शहरातील श्री सुरेश देसले, डॉ.रवींद्र देसले, दयाराम माळी, सुभाष माळी, उल्हास देशमुख, भिला माळी, सुनील चौधरी, सुभाष देसले, प्रकाश देसले, आर बी पाटील सर,उदय देसले, देवेंद्र पाटील, शरद पाटील, दिनेश माळी, चेतन परमार, पियुष बिरारीस ,दादा मराठे, देविदास देसले,भिका पाटील, बाळकृष्ण बोरसे, दिपक माळी, संदीप गिरासे, प्रवीण पवार,भीम सिंग राजपूत, मनिषा मोरे,जितेंद्र अहिरराव,सिकंदर पिंजारी,पंकज भामरे, आर एच भामरे, विनायक पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. यासाठी संचालक उज्वल पाटील, कार्याध्यक्ष अनिल पाटील, प्रशासन व जनसंपर्क प्रमुख सुरज देसले,संस्थेतील विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल भामरे व श्रीमती योगिता साळुंखे यांनी केले, तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.डी. पाटील यांनी मानले