जयहिंद हायस्कूलला व्याख्यानाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST2021-02-18T05:07:38+5:302021-02-18T05:07:38+5:30
जनभुमी फाउंडेशनचे मोफत मार्गदर्शन शिबिर धुळे : शहरातील जनभुमी फाउंडेशन अंतर्गत स्थापना दिनानिमित्त युवकांसाठी स्पर्धा परीक्षांसंदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिराचे ...

जयहिंद हायस्कूलला व्याख्यानाचा कार्यक्रम
जनभुमी फाउंडेशनचे
मोफत मार्गदर्शन शिबिर
धुळे : शहरातील जनभुमी फाउंडेशन अंतर्गत स्थापना दिनानिमित्त युवकांसाठी स्पर्धा परीक्षांसंदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम गुरुवारी स्वामी ऑटो सर्व्हिस सेंटर, शांतुषा नगर, सुरत बायपास येथे होणार आहे. युवकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनभूमी फाउंडेशनर्फे करण्यात आले आहे.
चितोड नाका रस्त्यावर
गतिरोधकाची संख्या जास्त
धुळे : शहरातील भाईजीनगरकडून चितोड नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावर गतिरोधकाची संख्या जास्त आहे. साधारण दीड किलोमीटरच्या रस्त्यावर सुमारे सात गतिरोधक आहेत. त्यामुळे वाहन चालविणाऱ्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्या अनेक जणांना मणक्याचा त्रास जाणवायला लागला आहे. गतिरोधक असावे; पण त्याची संख्या कमी करण्यात यावी, जेणेकरून वाहनचालकांना होणारा त्रास कमी होईल, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
तहसीलदार कार्यालयाजवळची वाहतूक समस्या
धुळे : शहरातील तहसीलदार कार्यालयाजवळील चौकात वाहतुकीची समस्या कायम आहे. दुपारी ११ ते १ वाजेदरम्यान याठिकाणी वाहतुकीची कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. चौकात यावेळेत वाहन नेणे म्हणजे तब्बल पाच मिनिट ते सहा मिनिटे लागतात. चौक क्राॅस करण्यास तरी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन शहर वाहतूक शाखेने याठिकाणी वाहतुकी कोंडीस कारण ठरणारी वाहन, लोटगाडी यांना हटवावे, अशी मागणी होत आहे.