सरपंचपदाची २८ आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:34+5:302021-01-23T04:36:34+5:30
दरम्यान, आता निवडणुका झालेल्या असून, सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी ...

सरपंचपदाची २८ आरक्षण सोडत
दरम्यान, आता निवडणुका झालेल्या असून, सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रत्येक तहसील कार्यालयात ही सोडत काढण्यात येणार आहे, तर महिला आरक्षणाची सोडत १ फेब्रुवारी, २१ रोजी काढण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
स्त्री आरक्षणाचे वेळापत्रक जाहीर
दरम्यान, शिरपूर व साक्री तालुक्यातील संपूर्ण अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील ग्रामपंचायतीसह उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
यात प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या अध्यक्षतेखाली १ रोजी सकाळी ११ वाजता धुळे तालुका व दुपारी १ वाजता साक्री तालुक्यातील महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, तर शिरपूरचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली याच दिवशी सकाळी ११ वाजता व दुपारी १ वाजता शिंदखेडा तालुक्यातील महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका
जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून, २०२० मध्ये २१८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत, तर २०२१ मध्ये ८८, २०२२ मध्ये १०८, २०२३ मध्ये ३३ व २०२४ मध्ये ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात आले.