धुळ्यात साडी आणि झेरॉक्सचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 11:51 IST2018-02-16T11:51:04+5:302018-02-16T11:51:58+5:30

पैठणी साडया लांबविल्या, चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

Laundered sari and Xerox shop in Dhule | धुळ्यात साडी आणि झेरॉक्सचे दुकान फोडले

धुळ्यात साडी आणि झेरॉक्सचे दुकान फोडले

ठळक मुद्देदेवपुरातील साईकृपा साडी सेंटर या दुकानाचा शुभारंभ अवघ्या दोन दिवसांपुर्वीच करण्यात आला होता़ दुकान नियमित सुरु होण्यापुर्वीच चोरट्याने यावर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे़  साडी सेंटरमधून  ४१ हजार आणि झेरॉक्सच्या दुकानातून १० हजार असे एकत्रित ५१ हजाराचा मुद्देमाल लंपास झाला आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील स्टेडिअम भागातील साडीच्या दुकानासह झेरॉक्सचे दुकान गुरुवारी पहाटे चोरट्याने फोडले़ यात दिड लाख किंमतीच्या साड्या गेल्या आहेत़ तर झेरॉक्सच्या दुकानातून रोख रकमेसह कागद चोरुन नेले.
शहरातील वाडीभोकर रोडवर जिल्हा क्रीडा संकुला समोर सरला पाटील यांचे साईकृपा आणि पैठणी  साडी सेंटरच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश केला. दुकानातून पैठणी साड्या आणि ५ हजार  रोख  चोरुन नेले. याप्रकरणी विलास दिपचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलिसात  चोरीचा गुन्हा दाखल झाला़ 
झेरॉक्सचे दुकान फोडले
साडीचे दुकानात चोरी केल्यानंतर चोरटयाने  जवळच असलेले ज्ञानेश्वर भटू कदम यांचे  झेरॉक्स दुकानाकडे आपला मोर्चा वळविला. शटरचे कुलूप तोडून चोरट्याने  दुकानातून रोख १० हजार  लंपास केले.   कदम यांच्या फिर्यादीवरुन पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा  दाखल झाला आहे़  

Web Title: Laundered sari and Xerox shop in Dhule