शिरपुरात स्वच्छता मोहिमेस सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:35 IST2019-11-19T11:34:31+5:302019-11-19T11:35:09+5:30
शिरपूर : डेंग्यूसह अन्य आजारांच्या संदर्भात घरोघरी जाऊन तपासणी

Dhule
शिरपूर : माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने गेल्या ३५ वर्षांपासून शहरात सातत्याने विकासाची कामे झाली आहेत. सर्वांच्या सोयीकरीता अत्याधुनिक हॉस्पिटल लवकरच सुरु करत आहोत. विकासकामांसाठी शासनाच्या निधीची आवश्यक असते, त्यादृष्टीने प्रयत्नशील आहोत. यापुढे कोणतीही समस्या राहणार नाही असे प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मार्गदर्शन करतांना केले़
लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष पटेल यांच्या संकल्पनेतून प्रभाग नं. २ मधील संत सेना नगर, करवंद रोडजवळ आर.सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या पाठीमागे माजी नगरसेवक नाटुसिंग गिरासे यांच्या घराजवळ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेविका रंजनाबाई सोनवणे, मुख्याधिकारी अमोल बागुल, माजी नगरसेवक नाटूसिंग गिरासे, मनोहर पाटील, भटू माळी, अमोल पाटील, राजेश सोनवणे, उल्हास अग्रवाल, भाऊसाहेब सोनवणे, जयवंत माळी, जगदीश बारी, बाळू पाटील, जय गणेश सोनार, प्रकाश वाघ, भरत बारी, अनिल सोनार, चंदू पाटील, ब्रिजेश थोरात, ज्ञानेश्वर बोरगावकर, आनंद बारी, प्रकाश पाटील, जगन्नाथ माळी, दिनेश बोरसे, प्रवीण बोरसे, राकेश सैंदाणे, राजेंद्र जाधव, अमोल ठाकरे, कमलाकर वाघ, सिद्धेश बोरगावकर, पंकज सैंदाणे, योगेश वाघ, नथ्थू पाटील, सुनील जैन, नगरपालिकेचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष भूूपेशभाई पटेल म्हणाले, शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वांनी हातभार लावावा. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यमय राहण्यासाठी नगरपालिकेला सर्वांनी सहकार्य करावे. यापुढे आवश्यक तेवढा पाणी पुरवठा नियमित होणारच आहे. पाणीपट्टी योग्य राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत़ विशेष स्वच्छता मोहिमेत संपूर्ण शहराची मोठया प्रमाणात साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू व इतर आजारांच्या बाबतीत घराघरात जावून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत व आरोग्याबाबत जागृत राहून नगरपालिकेला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले़ मुख्याधिकारी अमोल बागुल म्हणाले, स्वच्छता बाबत सर्व पूर्तता नगरपालिकेकडून सुरु आहे. डेंग्यू बाबत सर्वांनी काळजी घ्यावी. घरात सुद्धा त्याची उत्पत्ती होते, घरातील सर्वांची जबाबदारी आहे काळजी घेण्याची. घरात फ्रीजमध्ये अळ्या व टेरेसवर स्वच्छता पाहावे. पावसाचे पाणी टेरेसवर कुठे तरी साचलेले असते. आठवड्यातून एकदा सर्वांनी कोरडा दिवस पाळायचा आहे. नगरपालिका आपले काम करेल, पण प्रत्येक नागरिकाने देखील हातभार लावावा असेही ते म्हणालेत़ सूत्रसंचालन योगेंद्र गिरासे यांनी केले.