लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:53+5:302021-09-15T04:41:53+5:30
१२५८ एमसीएफटी क्षमतेचे असलेले लाटीपाडा धरण हे मंगळवारी पूर्ण भरले आहे. यामुळे पांझरा नदीत पाणी आल्याने पात्रात वाढ झाली ...

लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांमध्ये समाधान
१२५८ एमसीएफटी क्षमतेचे असलेले लाटीपाडा धरण हे मंगळवारी पूर्ण भरले आहे. यामुळे पांझरा नदीत पाणी आल्याने पात्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वांनाच लाटीपाडा धरण कधी भरेल, याची उत्सुकता होती आणि हीच उत्सुकता पूर्ण झाली आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या पावसामुळे हे धरण भरले आहे. लाटीपाडा धरणात वाढता जलस्तर लक्षात घेता, पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना रब्बीची चिंता मिटली आहे. शेतांच्या विहिरींना तसेच स्थानिक नागरिकांच्या बोअरवेल यांच्या पाण्याची पातळीही वाढीसाठी मदत होईल. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्व प्रकल्प आता पाण्याने भरली आहेत. यंदाच्या वर्षी पिंपळनेर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. आता तरी नागरिकांनी पाण्याची बचत करावी व भविष्यात पाणी टिकेल याप्रमाणे वापरावे, असे सर्व स्थरातून बोलले जात आहे.